Share

#लोकसभा निकाल : किर्तीकारांचा किल्ला शाबूत, संजय निरुपम यांचा लाजीरवाणा पराभव

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : गेल्या महिनाभर देशामध्ये धुमाकूळ घेतलेल्या लोकसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर होत आहे. या लोकसभा निवडणुकीत देशातील अनेक उमेदवारांची प्रतिष्ठापणाला लागली आहे. आतापर्यंत आलेल्या निकालानुसार देशात आणि राज्यात भाजप आणि मित्रपक्ष हे आघाडीवर आहेत. तर मुंबईचा उत्तर पश्चिम मतदारसंघाचा गड राखण्यात शिवसेना यशस्वी ठरली आहे. शिवसेनेचे उमेदवार गजानन किर्तीकर यांचा विजय निश्चित झाला आहे. कॉंग्रेसचे अनुभवी नेते संजय निरुपम यांना जोरदार टक्कर देत गजानन किर्तीकर यांनी विजय मिळवला आहे.

उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघातून युतीकडून शिवसेनेचे उमेदवार गजानन किर्तीकर यांना उमेदवारी देण्यात आली होती, तर त्यांच्या विरोधात कॉंग्रेसकडून संजय निरुपम यांना उतरवण्यात आले होते. अखेर उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघाच्या जनतेने गजानन किर्तीकर यांच्या हातात प्रतिनिधित्वाची धुरा दिल्याच दिसत आहे.

उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघाच्या या प्रतिष्ठेच्या लढाईमध्ये आता आलेल्या निकालांनुसार विजयी उमेदवार गजानन किर्तीकर यांना ३१८१८६ एवढी मत मिळाली आहेत. तर प्रतिस्पर्धी उमेदवार संजय निरुपम यांना १७६६२३ एवढी मत मिळाली आहेत. या झालेल्या एकतर्फी लढाईत गजानन किर्तीकर यांनी १४१५६३ मतांनी बाजी मारली आहे, असे म्हणता येईल.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!