Share

Breaking News : मतमोजणीला सुरवात होताच नांदेडमध्ये कॉंग्रेस आघाडीवर

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : गेल्या महिनाभर देशामध्ये धुमाकूळ घेतलेल्या लोकसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर होत आहे. या लोकसभा निवडणुकीत देशातील अनेक उमेदवारांची प्रतिष्ठापणाला लागली आहे.

मतमोजणीला सुरवात होताच महाराष्ट्रातून नांदेड लोकसभा मतदारसंघाचा कल आला आहे. नांदेड मतदारसंघातून कॉंग्रेस आघाडीवर आहे. नांदेड या मतदार संघातून आघडीकडून अशोक चव्हाण यांना उमेदवारी देण्यात आली होती, तर त्यांच्या विरोधात युतीकडून प्रताप पाटील यांना उतरवण्यात आले होते.

सत्ताधारी भाजप पुन्हा सत्तेत येणार की काँग्रेस 2014 मधील आपल्या कामगिरीत सुधारणा करणार? हे आज मतमोजणीनंतरच स्पष्ट होईल.

११ एप्रिल ते १९ मे दरम्यान लोकसभेच्या ५४२ जागांच्या मतदानासाठी मोठ्या संख्येने मतदार घराबाहेर पडले होते. ही निवडणूक सात टप्प्यात पार पडली. या सात टप्प्यात ९०.९९ कोटी मतदारांपैकी जवळपास ६७.११ टक्के मतदारांनी आपल्या मताचा वापर केला. देशात लोकसभा निवडणुकीसाठी झालेलं हे सर्वाधिक मतदान आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!