टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होत असून देशात आणि राज्यात भाजप आणि मित्रपक्ष हे आघाडीवर दिसत आहेत. तर राज्यात हिंगोली लोकसभा मतदारसंघात शिवसेनाआघाडीवर आहे.
हिंगोली लोकसभा मतदारसंघामधून शिवसेनेचे हेमंत पाटील तर कॉंग्रेसचे सुभाषराव वानखडे हे उमेदवार रिंगणात उतरले होते. या लढतीमध्ये शिवसेना आघाडीवर असल्याच दिसत आहे. शिवसेनेचे उमेदवार हेमंत पाटील हे ६४ हजार मतांनी आघाडीवर आहेत. आतापर्यंत आलेल्या निकालानुसार हेमंत पाटील यांना १३०९४५ तर कॉंग्रेसचे सुभाषराव वानखडे यांना ६६९४६ मत मिळाली आहेत.
सत्ताधारी भाजप पुन्हा सत्तेत येणार की काँग्रेस २०१४ मधील आपल्या कामगिरीत सुधारणा करणार? हे आज मतमोजणीनंतरच स्पष्ट होईल.
११ एप्रिल ते १९ मे दरम्यान लोकसभेच्या ५४२ जागांच्या मतदानासाठी मोठ्या संख्येने मतदार घराबाहेर पडले होते. ही निवडणूक सात टप्प्यात पार पडली. या सात टप्प्यात ९०.९९ कोटी मतदारांपैकी जवळपास ६७.११ टक्के मतदारांनी आपल्या मताचा वापर केला. देशात लोकसभा निवडणुकीसाठी झालेलं हे सर्वाधिक मतदान आहे.
Live Update महाराष्ट्र : भाजप – २३ , शिवसेना – १९ , कॉंग्रेस – १ , राष्ट्रवादी ४ , वंचित १


