टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होत असून देशात आणि राज्यात भाजप आणि मित्र पक्ष हे आघाडीवर दिसत आहेत. तर राज्यात चंद्रपूर लोकसभा मतदारसंघामध्ये धानोरकर आणि अहिर यांच्यामध्ये काटे की टक्कर पाहिला मिळत आहे. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघामध्ये कॉंग्रेसचे बाळूभाऊ धानोरकर हे १८६४ मतांनी आघडीवर आहेत.
चंद्रपूर लोकसभा मतदारसंघामधून भाजपने विद्यमान खासदार हंसराज खासदार यांना उमेदवारी देण्यात आली होती. तर त्यांना टक्कर देण्यासाठी कॉंग्रेसकडून बाळूभाऊ धानोरकर यांना रिंगणात उतरवण्यात आल होत. त्यामुळे कॉंग्रेसच्या या निर्णयाला यश मिळत असल्याच दिसत आहे. कारण आतापर्यंत आलेल्या निकालांनुसार कॉंग्रेसला चंद्रपूरमध्ये १८६४ मतांची आघाडी घेतली आहे. बाळूभाऊ धानोरकर यांना ८०८५१ तर हंसराज आहिर यांना ७८९८७ मत मिळाली आहेत.
Live Update महाराष्ट्र : भाजप : २३ , शिवसेना : १९ , राष्ट्रवादी : ४ , कॉंग्रेस : १ , वंचित : १
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

