टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होत असून देशात आणि राज्यात भाजप आणि मित्र पक्ष हे आघाडीवर दिसत आहेत. तर राज्यात रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीचे सुनील तटकरे आणि शिवसेनेचे अनंत गीते यांच्यामध्ये चुरस पाहिला मिळणार आहे. केवळ १६६१ मतांनी अनंत गीते हे आघाडीवर आहेत.
रायगड लोकसभा मतदारसंघाची निवडणूक ही राज्यातील प्रतिष्ठित निवडणुकीं पैकी एक आहे. या प्रतिष्ठेच्या लढतीमध्ये आनंत गीते यांना १३६९०६ मत मिळाली आहेत तर सुनील तटकरे यांना १३५२४५ मत मिळाली आहेत. या अटीतटीच्या लढाईमध्ये अनंत गीते हे १६६१ मतांनी आघाडीवर आहेत.
गेल्या लोकसभेला मोदी लाट असताना देखील सुनील तटकरे यांचा केवळ २५०० मतांनी पराभव झाला होता. त्यामुळे आता या निवडणुकीला सुनील तटकरे विजयी होणार का हे औत्सुक्याच ठरणार आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

