Share

उमेदवार निकाला आधी देवदर्शनाला, तर दिल्लीमध्ये मोदी सरकारसाठी होम-हवन

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा :  लोकसभा निवडणुकीचे निकाल आज जाहीर होणार आहेत. त्यामुळे लोकसभेच्या रिंगणात असलेल्या अनेक उमेदवारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणीला सुरवात होणार आहे. त्याआधी अनेक उमेदवारांनी सकाळी लवकर उठून देवदर्शनाचा तडाखा लावला आहे तर दिल्लीमध्ये मोदी समर्थकांनी मोदी सरकार पुन्हा देशात सत्तेवर यावे म्हणून होम-हवन केला आहे.

आजचा दिवस हा देशाच्या भविष्यासाठी महत्वाचा आहे. कारण गेले महिनाभर देशामध्ये धुमाकूळ घेतलेल्या लोकसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर होत आहे. त्यामुळे या मोठ्या शर्यतीत आपला टिकाव लागावा यासाठी उमेदवारांनी देवदर्शन घेऊन मतमोजणी केंद्राकडे प्रस्थान केले आहे. तर देशात गेल्या ५ वर्षात विधायक काम होत आहेत आणि ती काम पुढच्या ५ वर्षात देखील व्हावी यासाठी दिल्ली मध्ये मोदी सरकारने होमहवन केला आहे.

अर्ध्या तासानंतरच कल हाती येण्यात सुरुवात होईल. सत्ताधारी भाजप पुन्हा सत्तेत येणार की काँग्रेस २०१४ मधील आपल्या कामगिरीत सुधारणा करणार? हे आज मतमोजणीनंतरच स्पष्ट होईल.

११ एप्रिल ते १९ मे दरम्यान लोकसभेच्या ५४२ जागांच्या मतदानासाठी मोठ्या संख्येने मतदार घराबाहेर पडले होते. ही निवडणूक सात टप्प्यात पार पडली. या सात टप्प्यात ९०.९९ कोटी मतदारांपैकी जवळपास ६७.११ टक्के मतदारांनी आपल्या मताचा वापर केला. देशात लोकसभा निवडणुकीसाठी झालेलं हे सर्वाधिक मतदान आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!