Share

संजयमामांचा पराभव सहन न झाल्याने कार्यकर्त्याचा आत्महत्येचा प्रयत्न

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : माढ्यातील राष्ट्रवादीचे उमेदवार संजय शिंदेंचा पराभव सहन न झाल्याने एका तरुणाने विष प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. पांडुरंग शिंदे असे या तरुणाचे नाव असून बार्शी येथील खासगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु आहेत. माढा तालुक्यातील शिंदेवाडी येथील ही घटना आहे.

माढा लोकसभेच्या अटीतटीच्या लढाईत भाजपने अखेर राष्ट्रवादीचा बालेकिल्ला हस्तगत केला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार संजय शिंदे यांचा पराभव करत भाजपचे रणजीतसिंह निंबाळकर विजयी झाले आहेत. माढ्याच्या लढाईत अखेरपर्यंत आकड्यांचा खेळ सुरु होता, त्यामुळे दोन्ही उमेदवारांच्या समर्थकांची धाकधूक शेवटपर्यंत कायम होती. रणजीतसिंह निंबाळकर यांचा जवळपास ७५ हजारांपेक्षा जास्त मतांनी विजय झाला आहे.

माढा लोकसभा मतदारसंघात सुरुवातीपासून राजकीय उलथापालथ झाली, त्यामुळे मार्च – एप्रिलमध्येच नेत्यांना घाम फुटल्याचं पहायला मिळालं, रणजितसिंह मोहिते पाटील यांचा भाजप प्रवेश, संजय मामा शिंदे यांची राष्ट्रवादीमध्ये घरवापसी, मोहिते पाटील यांच्या ऐवजी फलटणच्या रणजितसिंह निंबाळकरांना भाजपने दिलेली उमेदवारी मतदारसंघात चर्चेचा विषय ठरला होता.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!