टीम महाराष्ट्र देशा : कोल्हापूर लोकसभा मतदार संघातून शिवसेनेचे संजय मंडलिक यांना मोठा दिलासा, मतमोजणी सुरु होताचं संजय मंडलिक आघाडीवर असल्याचे समोर आले आहे.
राज्यात मतमोजणीला सुरवात. भाजप ७ तर शिवसेना २ आणि कॉंग्रेस दोन जागांवर आघाडीवर.
विशेष म्हणजे, नरेंद्र मोदी या एका व्यक्तीभोवती केंद्रित झालेली निवडणूक, मोदी विरुद्ध सर्व विरोधी पक्ष अशीच अखेरपर्यंत रंगली. ११ एप्रिल ते १९ मे २०१९ या काळात देशभरात सात टप्प्यात घेण्यात आलेल्या या निवडणुकीचा निकाल आज २३ मे रोजी हाती येत आहे. महाराष्ट्रात यंदा प्रथमच चार टप्प्यात झालेल्या निवडणुकीसाठी कॉंग्रेस आघाडी विरुद्ध भाजप-शिवसेना महायुती अशी थेट लढत झाली.
देशाप्रमाणेच, महाराष्ट्रातील लोकसभेची निवडणूकही अनेक अर्थांनी वैशिष्ट्यपूर्ण ठरली. सध्या सगळेच राजकीय पक्ष मतदानाच्या टक्केवारीवरून जय-पराजयाचे अंदाज बांधण्यात गुंतले आहेत. मात्र राज्यात चार टप्प्यांमध्ये उसळी घेतलेला मतदानाच्या टक्केवारीचा चेंडू नक्की कोणाच्या हातात पडणार हे आज स्पष्ट होत आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

