Share

पुत्र असावा तर असा …आईच्या पराभवाचा लेकाने घेतला 10 वर्षांनी बदला

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा- हातकणंगले येथील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विद्यमान खासदार राजू शेट्टी पराभवाच्या छायेत आहे. डावी आघाडी, महायुती यांचे पाठबळ घेऊन ते दोनदा लोकसभेत पोहचले होते. मात्र, यंदा राष्ट्रवादी-काँग्रेसच्या गोठात दाखल झाले होते. मात्र,सध्याची आकडेवारी पाहता राजू शेट्टींचा पराभव दिसून येतोय. राजू शेट्टींच्या विरोधात शिवसेनेचे धैर्यशील माने रिंगणात उतरले होते.

भाजपकडून हातकणंगले मतदारसंघात खासदार राजू शेट्टी यांना पराभूत करण्यासाठी राज्य पातळीवरून यंत्रणा राबवली गेली. नवखा उमेदवार असूनही धैर्यशील माने यांनी जोरदार हवा केली. नवमतदारांवर प्रभाव टाकण्यात धैर्यशिल माने यशस्वी झाले. धैर्यशील मानेंना इचलकरंजी, जयसिंगपूरमधील उद्योजकांचा पाठिंबा मिळाला. शेट्टींच्या राजकीय कारकिर्दीतील हा पहिलाच पराभव ठरला आहे.

आईच्या पराभवाचा 10 वर्षांनी घेतला बदला

मतदारसंघांची पुनर्रचना होण्यापूर्वी इचलकरंजी मतदारसंघातून धैर्यशील माने यांची आई माजी खासदार निवेदिता माने या १९९९आणि २००४ मध्ये लोकसभा जिंकल्या होत्या. २००९ मध्ये हातकणंगलेतून त्यांनी राष्ट्रवादीच्या तिकीटावर निवडणूक लढवली. मात्र, यावेळी राजू शेट्टींनी त्यांचां दारूण पराभव केला होता.

विजयी रथावर आरूढ झालेल्या राजू शेट्टींनी २०१४ मध्येही विजय मिळवला. त्यावेळी त्यांनी काँग्रेसच्या कल्लापा आवाडेंचा पराभव केला होता. आईच्या पराभवाचा १० वर्षांनी घेतला बदला घेत यंदा निवेदिता मानेंच्या पुत्रानेच खासदार राजू शेट्टींची विजयी घौडदौड रोखली.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!