मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोना बाधित रुग्णांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या वाढत्या कोरोनाच्या संसर्गाला रोखण्यासाठी राज्य सरकार तसेच स्थानिक प्रशासन अनेक उपाययोजना राबवत आहे. राज्यात लॉकडाऊन करण्यात आला असून आता जिल्हा पातळीवर पूर्ण लॉकडाऊन करण्यात येत असल्याचे समोर येत आहे.
दरम्यान, राज्यात बुधवार दि. 14 एप्रिल 2021 पासून रात्री 8 वाजेपासून 1 मे 2021 पर्यंत लॉकडाऊन लावण्यात आला होता, आता राज्यातील लॉकडाऊन पुन्हा एकदा वाढवण्यात आलाय. ब्रेक दि चेन अंतर्गत राज्यातील कडक निर्बंध 15 मेपर्यंत वाढविले असून, राज्यात 15 मेपर्यंत संचारबंदी राहणार आहे.
मात्र राज्यात कोरोना रुग्णांची संख्या काही आटोक्यात येताना दिसत नसल्याने लॉकडाऊन आणखी १५ दिवस म्हणजे ३० मे पर्यंत वाढवण्यात येण्याची शक्यता आहे. याबाबत बुधवारी कॅबिनेट बैठकीमध्ये निर्णय होणार असल्याची माहिती समोर येत आहे.
दुसरीकडे, जवळपास अर्धा महाराष्ट्र पूर्ण लॉकडाऊनच्या गर्तेत गेला आहे. १७ शहरांसह जिल्ह्यांमध्ये देखील पूर्ण लॉकडाऊन लावण्यात येत आहे. एकाबाजूला मुंबईसह महाराष्ट्राचं कौतुक केंद्रीय स्तरावर केलं जात असलं तरी ग्रामीण महाराष्ट्रासह काही शहरांमध्ये कोरोनाचा उद्रेक होत आहे. याच पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासन कठोर पाऊल उचलत आहे.
‘या’ १७ शहरांमध्ये पूर्ण लॉकडाऊन !
नाशिक, कोल्हापूर, सोलापूर, लातूर, बदलापूर, वर्धा, सांगली, सातारा, बीड, नांदेड, वाशिम, अमरावती, यवतमाळ, अकोला, सिंधुदुर्ग, इंदापूर, बारामती या १७ शहरांमध्ये पूर्ण लॉकडाऊन करण्यात आला आहे. दरम्यान, यातील काही शहरांमध्ये येत्या २ दिवसात पूर्ण लॉकडाऊन करण्याची घोषणा करण्यात आली आहे. यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात जरी पूर्ण लॉकडाऊन नसला तरी या शहरांचा व जिल्ह्यांचा आढावा घेतल्यास अर्धा महाराष्ट्र पूर्ण लॉकडाउनच्या स्थितीमध्ये गेला आहे.
महत्वाच्या बातम्या
- औरंगाबादकरांचा ग्रामीण भागातील लसींवर डल्ला… ग्रामीण भागातील तरुण लसीकरणापासून वंचित!
- कोरोना संकटात ठाकरे सरकारकडून कोणत्याही बदल्या न करण्याचा निर्णय
- आंबेडकरवादी कृती समितीचे मुंडन आंदोलन! पदोन्नती मधील आरक्षण रद्द केलेला निर्णय मागे घेण्याची मागणी
- कोविड-19 मुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांसाठी महिला व बालकल्याण विभागाचा मोठा निर्णय !
- शरद पवारांच्या विश्वासू माजी आमदाराचं कोरोनाने निधन ! पवारांसह फडणवीसांनी व्यक्त केला शोक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

