Share

…शून्यापासून सुरू केलं आहे, पंकजा मुंडेंच्या ‘त्या’ ट्विट वरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधान

Published On: 

मुंबई : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी पुन्हा एकदा आपल्या ट्विटर अकाऊंटवरून स्वतःच स्वतःला शिकवते आहे… शून्यापासून सुरू केलं आहे….अशा आशयाचे ट्विट केले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे.

तसे पाहता पंकजा मुंडे यांनी हे ट्विट स्वतः काढलेल्या चित्राविषयी होते. आपला नवीन छंद म्हणून एक चित्र काढत पंकजा मुंडे यांनी त्यावर स्वतःच स्वतःला शिकवते आहे… शून्यापासून सुरू केलं आहे… असे वर्णन केले होते. याचा रोख नक्की कोणाकडे आहे यावरून राजकीय वर्तुळात चर्चांना पेव फुटला आहे.

विधानपरिषदेच्या निवडणुकीत पंकजा मुंडे यांची वर्णी लागेल अशी चर्चा होती. मात्र पक्षाने जुन्या चेहऱ्यांना खाली बसवत नवीन चेहऱ्यांना संधी दिली आहे. त्यामुळे पंकजा मुंडे या नाराज असल्याचं बोललं जात आहे. याआधी ही नाराज झालेल्या पंकजा मुंडे यांनी आपल्या समर्थकांनी भावनिक ट्वीट केलं आहे. ‘पण, वाघांनो असं रडताय काय मी आहे ना ,’तुमच्यासाठी मी आणि माझ्यासाठी तुम्ही’, असं पंकजा यांनी म्हटलं होतं.

आता सोमवारी संध्याकाळी पंकजा यांनी ट्वीट करत आपल्या नव्या छंदाविषयी माहिती दिली आहे. स्वतःच स्वतःला शिकवते आहे. असं त्यांनी चित्राबद्दल म्हटलं असलं, तरी याचा राजकीय अर्थ आहे का याची चर्चा होते आहे.

2019 लोकसभा निवडणुकीच्या आधी राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले रणजीत सिंह मोहिते यांच्यासह डॉ. अजित गोपचडे, प्रवीण दटके आणि गोपीचंद पडळकर यांना संधी दिली आहे. त्यामुळे भाजपने पंकजा मुंडे, एकनाथ खडसे, चंद्रशेखर बावनकुळे, विनोद तावडे, प्रकाश मेहता यासारख्या बंडखोरांना चाप लावल्याचं स्पष्ट झालं आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

डिस्चार्ज देण्याबाबत ICMRने काढली नवी नियमावली, सौम्य लक्षण असणाऱ्यांना लगेच सोडणार

येत्या शैक्षणिक वर्षांपासून पहिली ते सहावीपर्यंत मराठी भाषा सक्तीने शिकवली जाणार

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!