अहमदनगर/ऋषिकेश घोगरे : अहमदनगर जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. सुरुवातीला नगर शहर तसेच परिसरात कोरोना बाधित रुग्ण आढळून येत होते. परंतु आता जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. मागील काही दिवसांत राहुरी तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. म्हणूनच आज प्रशासन, व्यापारी, विविध संघटना, पत्रकार आणि लोकप्रतिनिधी यांच्या संयुक्त बैठकीत संपूर्ण राहुरी तालुक्यात गुरुवार १० सप्टेंबर ते १७ सप्टेंबर पर्यंत लॉकडाउन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सुरुवातीच्या काळात राहुरी तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या अल्प प्रमाणात होती. मात्र अलीकडच्या काही दिवसांत ही संख्या प्रचंड वाढल्याने अखेर प्रशासनाला लॉकडाउन करण्याचा निर्णय घ्यावा लागला आहे. राहुरी तालुक्यात मागील आठ दिवसांपासून बाधितांचा वेग वाढला आहे. तालुक्यात मागील दोन दिवसांपासून ५० पेक्षा जास्त रुग्ण सापडू लागल्याने प्रशासन हतबल झाले होते.
उपजिल्हा रुग्णालयाची कार्यवाही वेगाने करावी- स्नेहलता कोल्हे
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राहुरी तालुका आठ दिवस लॉकडाऊन करून, जनता कर्फ्यू लागू करावा अशी मागणी जोर धरू लागली होती. अखेरीस प्रशासन, व्यापारी, विविध संघटना, पत्रकार आणि लोकप्रतिनिधी यांच्या संयुक्त बैठकीत राहुरी तालुका १० सप्टेंबर ते १७ सप्टेंबर पर्यंत लॉकडाऊन करण्याचा निर्णय बैठकीत झाला आहे.
‘स्वत:चा अजेंडा रेटणाऱ्यांची काळजी भाजपचं सरकार घेतं’


