अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- कोपरगाव शहराजवळून दोन प्रमुख राज्यमार्ग जात असून, विविध शैक्षणिक संस्था, सहकारी साखर कारखाने, औद्योगिक वसाहत यामुळे प्रचंड रहदारी शहरात असते. अनेक अपघात याठिकाणी होत असतात. अपघातग्रस्तांना तातडीने वैद्यकीय सेवा मिळावी म्हणून येथील ग्रामीण रुग्णालयाचे रूपांतर उपजिल्हा रुग्णालयात करावे.
तसेच ट्रॉमा केअर सेंटर सुरू करण्यासंदर्भातील शासनस्तरावर अंतिम टप्प्यात असलेली कार्यवाही वेगाने करावी, अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश सचिव माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली आहे. पुढे कोल्हे म्हणाल्या, लवकरात लवकर कोपरगाव येथील ग्रामीण रुग्णालयाचे रूपांतर उपजिल्हा रुग्णालयात करावे, तसेच ट्रॉमा केअर सेंटरची उभारणी वेगाने करावी.
‘स्वत:चा अजेंडा रेटणाऱ्यांची काळजी भाजपचं सरकार घेतं’
त्यासाठी ग्रामीण रुग्णालयाशेजारी जागाही उपलब्ध आहे. आरोग्य सेवा संचालनालयाच्या बृहत आराखड्यात या मागणीचा समावेश करण्यात आलेला आहे. ट्रॉमा केअर युनिटच्या मुख्य इमारतीच्या बांधकामाचे सात कोटी ३१ लाख २३ हजार ८८४ रुपये खर्चाचे ढोबळ अंदाजपत्रक सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तातडीने मागविण्यात आले आहे. उपजिल्हा रुग्णालयाची कार्यवाहीही अंतिम टप्प्यात आहे.
अभिनेता अर्जुन कपूरनंतर आता मलाईका अरोराची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह
सध्या जिल्ह्यात कोरोनाचे मोठे संकट आहे. कोपरगाव शहरात आरोग्यसेवा पुरेशा नसल्याने रुग्णांना सुमारे शंभर किलोमीटरवरील जिल्हा रुग्णालयात जावे लागते. त्यामुळे वरील कामे तातडीने करावीत, अशी मागणी कोल्हे यांनी केली आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

