टीम महाराष्ट्र देशा – शेतक-यांची खऱ्या अर्थाने प्रगती व्हावी यासाठी उत्पादन खर्च कमी करून उत्पादकतेत वाढ करणारे तंत्रज्ञान विकसित करावे लागेल. तरच शेती शाश्वत होऊ शकेल. असे मत राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी परभणी येथे व्यक्त केले.
फडणवीस पुढे असेही म्हणाले, शेतक-यांच्या प्रगतीसाठी कर्जमाफी हा अंतिम उपाय नाही. शेतकऱ्याच्या शाश्वत प्रगतीसाठी उत्पादन खर्च कमी करणे आणि उत्पादकता वाढवण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर झाला पाहिजे.
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतानाही, कर्जमाफी हा फक्त तात्पुरता उपाय असून शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणींवर ही मलमपट्टी आहे. खर्या अर्थाने शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवायचे असतील तर वेगवेगळ्या पातळीवर रचनात्मक बदल करण्याची गरज असल्याबद्दलही ते आग्रही होते.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

