Share

शेतकऱ्यांच्या न्याय मागण्यां संदर्भात योग्य निर्णय घेणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Published On: 

मुंबई: सुरुवातीपासून आमचे सरकार मोर्चेकरी शेतकऱ्यांच्या संपर्कात होते. मोर्चामध्ये 90 ते 95 टक्के गरीब आदिवासी सहभागी आहेत. सामान्य मुंबईकरांना त्रास होणार नाही असा शिस्तबद्ध आणि विद्यार्थ्यांना अडथळा न आणता मोर्चा काढल्याबद्दल त्यांचं कौतुक करतो, तसेच त्यांच्या रास्त मागण्यांवर टाइम बाऊंड तयार करण्याच्या सरकारचा प्रयत्न असून शेतकऱ्यांच्या न्याय मागण्यां संदर्भात योग्य निर्णय घेणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. विधानसभेच कामकाज सुरु होताच विरोधकांनी किसान लौंग मार्च संदर्भात प्रश्न उपस्थित केला, यावेळी उत्तर देताना ते बोलत होते.

नाशिकमधून निघालेले लाल वादळ म्हणजेच शेतकरी, शेतमजूर, कष्टकऱ्यांचा लाँग मार्च आज पहाटेच्या सुमारास मुंबईतील आझाद मैदानावर दाखल झाला आहे. सामान्य मुंबईकर तसेच परीक्षार्थी विद्यार्थ्यांची गैरसोय होवू नये यासाठी पहाटेच लाँग मार्च आझाद मैदानावर आला.

सर्व शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी, शेतमालाला भाव, वनजमिनींचं हस्तांतरण अशा मागण्यांसाठी निघालेले शेतकरी आज विधानसभेला घेराव घालणार आहेत. सरकारने देखील उशिरा का होईना मंत्री गटाची स्थापना करत शेतकरी आंदोलकांशी बोलण्याची तयारी दर्शवली आहे. दरम्यान, आता गोळ्या झाडल्या तरी लेखी आश्वासन मिळेपर्यंत माघार नसल्याचा निर्धार शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे.

दुपारी दोनच्या सुमारास मंत्री गट आणि आंदोलकांची चर्चा होणार असल्याची माहिती मिळत आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!