औरंगाबाद: कोरोनामुळे प्राथमिक शाळेची बंद असलेली दारे अखेर सोमवारपासून उघडली आहेत. त्यामुळे तब्बल २० महिन्यानंतर प्राथमिक शाळेची घंटा वाजली आहे. एवढ्या दिवसानंतर शाळा उघडल्याने पहिल्याच दिवशी पालकांचाच जास्त उत्साह दिसून आला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एका वर्गात कमी विद्यार्थ्यांना बसवण्यात आले.
औरंगाबाद शहरातील प्राथमिक शाळा सोमवारी सुरू झाल्या. त्यामुळे शाळेत पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. शाळेत विद्यार्थी हजर राहण्यापूर्वीच शिक्षक शाळेत हजर झाले होते. विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी प्रवेशद्वारावर उभे राहून विद्यार्थ्यांची थर्मल गनद्वारे तपासणी करून पालकांचे संमतीपत्र घेऊन विद्यार्थ्यांचे स्वागत केले. सुरक्षित अंतर ठेवून, विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प देऊन त्यांचे स्वागत केले. काही शाळामध्ये ढोल वाजवून, फुग्यांनी शाळा सजावट करून विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले.
एवढ्या दिवसानंतर विद्यार्थी आणि शिक्षक भेटले त्यामुळे संपूर्ण शाळांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. तसेच विद्यार्थ्यांना मास्क लावावा, काळजी घ्यावी, याशिवाय घरी राहून काय काय केले याचा संपूर्ण आढावा विद्यार्थ्यांकडून शिक्षकांनी घेतला. याशिवाय पालकांना देखील भेटून आनंद व्यक्त केला. याशिवाय विद्यार्थ्यांना शाळेत मास्क लावूनच सुरक्षित अंतर ठेवूनच बसण्याची व्यवस्था केली असल्याचे शाळेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले. याशिवाय सर्वांनी काळजी घेऊनच शाळेत यावे असे आवाहन यावेळी शाळेच्या वतीने करण्यात आले.
आई, वडिल मुलांना सोडण्यासाठी शाळेत
सकाळ होताच शाळेत जाण्याची घाई पुन्हा सुरू झाली. विद्यार्थ्यांची तयारी करून एका हातात बॅग एका हातात विद्यार्थ्यांचे बोट धरून आई, वडील पुन्हा शाळेत आपल्या पाल्यांना सोडवण्यासाठी आले. विद्यार्थ्यांबरोबर पालकांमध्ये शाळा उघडण्याचा उत्साह दिसून आला. पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना शाळेत नेऊन सोडणे आणि शाळेतून घरी आणण्यासाठी पालकांची लगबग सुरू होती. याशिवाय पालकांनी मुलांना शाळेत सोडून शिक्षकांना भेटून काळजी घ्या, गुरुजी लक्ष असू द्या म्हणून सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या
- “कुंपणच शेत खात असेल तर…” पेपरफुटीवरुन दरेकरांचा घणाघात
- सर्वाधिक सर्च केलेल्या चित्रपटांच्या यादीत ‘KGF Chapter 2’ अव्वल स्थानी
- वॉशिंग्टन सुंदरच्या निवडीवर माजी खेळाडूची प्रतिक्रिया
- “ज्वलंत हिंदुत्व UPA च्या दावणीला…” भाजपाची शिवसेनेवर खोचक टीका
- “बरं झालं असतं मुख्यमंत्र्यांसारखं…” ; सदाभाऊ खोतांनी घेतली फिरकी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

