टीम महाराष्ट्र देशा – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दीची ठिकाणं टाळण्याचं आवाहन राज्य शासन वारंवार करत आहे. याच पार्श्वभूमीवर पुण्यातील दारूची दुकाने ३१ मार्चपर्यंत बंद करण्याचा मोठा निर्णय पुण्याचे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी घेतला आहे.
याआधी गर्दी टाळण्यासाठी मॉल, दुकाने, मंदिर बंद ठेवण्यात आली आहेत. तसंच नागरिकांनी देखील गरज नसल्यास घराबाहेर न पडण्याचं आवाहन प्रशासन वारंवार करत आहे.
पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील सर्व एफएल III परवाना धारक दुकाने (तारांकित हॉटलांचा अपवाद) या ठिकाणी मद्य विक्री बंद ठेवली जाणार आहे. १८ मार्च ते ३१ मार्चपर्यंत पूर्ण दिवस ही मद्यविक्री बंद ठेवली जाणार आहे.
दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन झाल्यास त्यांच्या विरुद्ध महाराष्ट्र अधिनियमन 1949 आणि त्याअंर्तगत कलम आणि नियमानुसार योग्य ती कडक कारवाई केली जाणार आहे.
Naval Kishore Ram, District Magistrate of Pune has passed an order to close all liquor serving establishments, including beer bars, in Pune and Pimpri-Chinchwad till 31st March, in order to prevent the spread of #COVID19. #Maharashtra
— ANI (@ANI) March 18, 2020
दरम्यान नागपूरचे जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनीही दारूची दुकाने , रेस्टोरंट आणि पान शॉप्स ३१ मार्च पर्यंत बंद करण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही खबरदारी घेतली जात आहे.
Ravindra Thakre, District Collector, Nagpur: Liquor shops, restaurants & paan shops will remain closed from today till 31st March, in order to control the spread of #COVID19. #Maharashtra
— ANI (@ANI) March 18, 2020
हेही पहा –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

