Share

निष्ठावंताना न्याय द्या, आयारामांमुळे व्यथित शिवसैनिकांनी रक्ताने लिहिले पक्षप्रमुखांना पत्र

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी भाजप – शिवसेनेत इतर पक्षातून येणाऱ्यांची गर्दी वाढत आहे. बाहेरून येणाऱ्याची संख्या वाढत असल्याने पक्षासाठी निष्ठेने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांवर अन्याय होत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. बार्शी तालुक्यातील शिवसैनिकांनी रक्ताने पत्र लिहित पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना विधानसभा निवडणुकीत निष्ठावंताना संधी देण्याची मागणी केली आहे.

बार्शी तालुका महिला आघाडी प्रमुख मंगलताई कदम, राजाभाऊ गायकवाड, विक्रांत पवार यांच्यासह शेकडो शिवसैनिकांनी उद्धव ठाकरे यांना आपल्या रक्ताने पत्र लिहिले आहे. बार्शी विधानसभा मतदारसंघात बाहेरून येणाऱ्या संधीसाधुला उमेदवारी न देता, गेली दहा वर्षे पक्षासाठी काम करणारे भाऊसाहेब आंधळकर यांना उमेदवारी देण्याची मागणी पत्रात करण्यात आली आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मागील आठवड्यात डझनभर नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला, येत्या काही दिवसांत कॉंग्रेस – राष्ट्रवादीचे आणखीन काही नेते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे. भाजपचा मित्रपक्ष असणाऱ्या शिवसेनेतही आगामी काळामध्ये जोरदार इनकमिंग होणार असल्याचं दिसत आहे.

बार्शी मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विद्यमान आमदार दिलीप सोपल शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरु आहे. तर दुसरीकडे युतीच्या जागा वाटपात हा मतदारसंघ शिवसेनेकडे असल्याने सध्या भाजपमध्ये असणारे मात्र कधीकाळी सेना आमदार राहिलेले राजेंद्र राऊत पुन्हा स्वगृही परतण्यासाठी उत्सुक आहेत.

महत्वाच्या बातम्या 

स्नेहलता कोल्हेंचा बळी की मेहुण्याचे आव्हान ? विखेंसमोर मोठा पेच

आम्ही पक्षात बळजबरी करत नाही, विधानसभा लढण्याचा निर्णय पार्थ स्वत: घेईल – अजितदादा

भाजप-सेनेकडून सत्तेचा गैरवापर; शरद पवारांचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा

सोलापुरात राष्ट्रवादीनंतर कॉंग्रेसच्या ‘या’ दोन नेत्यांनीही मारली मुलाखतीला दांडी

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!