मुंबई : विधानसभा निवडणुकीनंतर राज्यातील राजकारणात महानाट्य पहायला मिळाले आहे. एका बाजूला शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसची सत्तास्थापनेची बोलणी सुरु होती, तर दुसरीकडे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी हातमिळवणीकरून राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी शपथविधी उरकून टाकला होता. मात्र, राजकीय धुरंदर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी ८० तासांमध्ये सर्व चित्र पलटून टाकले. पुन्हा एकदा हे सर्व आठवण्याचं कारण म्हणजे नुकतच देवेंद्र फडणवीस यांनी ‘द इनसायडर’ला दिलेली स्फोटक मुलाखत. या मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांनी अनेक गौप्यस्फोट केले आहेत. यावर आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी फडणवीसांना प्रत्युत्तर दिल आहे.
पाणावलेल्या डोळ्यांनी शहीद सुनील काळे यांना गावकऱ्यांनी दिला अखेरचा निरोप!
देवेंद्र फडणवीस यांनी मुलाखत मी ऐकली नाही ती ऐकल्यावर फडणवीसांना योग्य वेळी योग्य उत्तर दिल जाईल. त्याच्या विधानाच योग्य विश्लेषण केलं जाईल. अस जयंत पाटील म्हणाले आहेत. तर विरोधी पक्षात असल्यावर काम कमी असतात तेव्हा त्याकडे लक्ष देण्याची गरज नाही. त्यांच्या विधानात काही तथ्थ नसल्याच देखील जयंत पाटील म्हणाले आहे.
दरम्यान, जेष्ठ पत्रकार राजू परुळेकर यांना दिलेल्या मुलाखतीमध्ये फडणवीस यांनी अनेक गोष्ठींचा खुलासा केला आहे. विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना सत्ता बनवायला तयार नसताना राष्ट्रवादी काँग्रेसकडून थेट सिग्नल होता. आमच्यामध्ये दोन बैठका झाल्या. त्यातील एका बैठकीला मी होतो, एकाला नाही. त्या बैठकीनंतरच दोघांनी मिळून पुढे जायचं ठरलं होतं. भाजप सोबत जायचं हा निर्णय काही एकट्या अजित पवारांनी घेतला नाही. हा निर्णय हा राष्ट्रवादीच्या नेतृत्वाचा होता, असा गौप्यस्फोट फडणवीस यांनी केला.
अजित पवारांसोबत स्थापन केलेलं सरकार सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आमच्या विरोधात गेला नसता तर टिकलं असतं. 100 टक्के टिकलं असतं. ती पूर्ण व्यवस्था आम्ही केली होती. दुर्दैवाने सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आमच्या विरोधात गेला. आणि त्यामुळे त्यात आम्ही फारसं काही करु शकलो नाही. म्हणून मी आज जेव्हा मागे वळून पाहिल्यानंतर असं वाटतं हा निर्णय चुकला होता. असही देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
तुकाराम मुंढे यांनी गंभीर गुन्हा केला आहे, कायद्यापेक्षा स्वतःला त्यांनी मोठं समजू नये- भाजप
त्यानंतर आता अजित पवार तातडीने शरद पवारांच्या भेटीला पोहचले आहेत. सिल्व्हर ओक बंगल्यावर दाखल अजित पवार झाले आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यानंतर या भेटीला महत्त्व प्राप्त झाले आहे. दरम्यान, विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देखील या बैठकीत चर्चा होणार आहे. नुकतेच अजित पवार यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती. एकून राज्यावर असणारे कोरोनाचे संकट, येणारी विधानपरिषद निवडणूक आणि देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट यामुळे पवार काका-पुतण्याच्या भेटीला अनन्य साधारण महत्व प्राप्त झाल आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

