Share

पाणावलेल्या डोळ्यांनी शहीद सुनील काळे यांना गावकऱ्यांनी दिला अखेरचा निरोप!

Published On: 

सोलापूर : महाराष्ट्रामधील सोलापूर जिल्ह्याच्या बार्शी तालुक्यातील पानगाव येथील सीआरपीएफचे जवान सुनील काळे यांना जम्मू काश्मीरमध्ये पुलवामा परिसरात दहशतवाद्यांशी लढताना वीरमरण आले. पुलवामामध्ये दहशतवाद्यांसोबत लढतान शहीद झालेले सोलापुरातील सुनील काळे अनंतात विलीन झाले आहेत.

पोस्ट आणि बँक कर्मचाऱ्यांना मुंबईत लोकल प्रवासाला परवानगी द्या- भाजपा

लष्करी इतमामात त्यांच्यावर पानगाव या त्यांच्या मूळगावी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे मोठे बंधू नंदकिशोर काळे आणि मुलाने त्यांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला.जड अंत:करणाने सुनील काळे यांना शोकाकूल अखेरचा निरोप देण्यात आला.

सीआरपीएफ, तसंच ग्रामीण पोलिसांनी शहीद सुनील काळे यांना मानवंदना दिली. सुनील काळे यांना निरोप देण्यासाठी आरपीएफचे महानिरीक्षक संजय लाटकर, सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पोलीस अधीक्षक मनोज पाटील, खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार राजेंद्र राऊत, जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे उपस्थित होते.

राहुल गांधींनी काँग्रेसचं अध्यक्षपद स्वीकारावे, कॉंग्रेस नेत्यांचा आग्रह

काळे यांच्या निवृत्तीला काहीच महिने शिल्लक होते मात्र त्यांनी आपली सेवा वाढवून घेतली होती. तसेच त्यांची बदली देखील दिल्लीला झाली होती. मात्र ते लॉकडाऊनमुळे ते तिकडे जाऊ शकले नाहीत.सुनील काळे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, आई, दोन भाऊ, एक विवाहित बहिण असा परिवार आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!