Share

भाजपकडून उमेदवारी देण्यात आलेले महास्वामी जाणून घ्या नेमके कोण आहेत ?

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : आगामी लोकसभा निवडणुकीत सोलापूर मतदार संघातून भाजपकडून डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी हे निवडणूक लढवणार आहेत. विद्यमान खासदार शरद बनसोडे यांचे तिकीट कापत भाजप ने डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांना सोलापूर मतदार संघाचे नेतृत्व करण्याची संधी दिली आहे.

कोण आहेत महास्वामी

शिवाचार्यरत्न श्री. ष. ब्र . डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी हे अक्कलकोट तालुक्यातील गौडगाव संस्थानचे संस्थापक आहेत. १ जून १९५५ रोजी त्यांचा जन्म झालं असून आजमितीला त्यांचे वय ६३ आहे. त्यांचे शिक्षण एसएससी महाराष्ट्र बोर्ड पुणे, त्यानंतर १९७८-७९ साली त्यांनी बनारस हिंदू विश्व विद्यालयातून बी. ए. , १९८१-८२ मध्ये याच विद्यालयातून एम. ए. आणि याच विद्यालयातून १९८८-८९ साली त्यांनी एम. ए. पी. एचडी . पदवी संपादन केली आहे. वीरशैव एवंम काश्मीर शैवदर्शनमे मोक्षका चिंतन या विषयावर त्यांनी पी. एच. डी. केली आहे. त्यांच्या आईचे नाव रुद्रम्मा हिरेमठ आणि वडिलांचे नाव गुरुबसय्या हिरेमठ आहे.

महास्वामींचे शैक्षणिक कार्य

महास्वामींनी १२ जून १९८९ साली श्री. गुरुसिद्धमल्लेश्वर कल्याण केंद्र ट्रस्टची स्थापना केली आहे. १९९१ मध्ये त्यांनी गौडगाव येथे श्री. जगद्गुरूपंचाचार्य प्रशाला सुरु केली . अक्कलकोट शहरात बी. बी. ए . व बी. सी. ए . महाविद्यालय व यतेश्वर पब्लिक स्कुल आणि नूतन प्राथमिक मराठी शाळा सुरु केली आहे. गौडगाव येथे मागासवर्गीय वसतिगृह सुरु करण्यात आले आहे. याशिवाय माशाळ व गौडगाव येथे संस्कृती केंद्राची स्थापना केली आहे. शेळगी सोलापूर येथे शिवयोगीधाम या अध्यात्मिक केंद्राची त्यांनी स्थापना केली आहे. महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्रप्रदेश या ठिकाणी महास्वामींनी मराठी, कन्नड व हिंदी भाषेतून विविध विषयांवर आशीर्वचन दिले आहे. अध्यात्मिक गुरु म्हणून ते सर्वांना परिचित आहेत. संस्थान हिरेमठ व शिवयोगी धाम सेवा समितीच्या माध्यमातून आतापर्यंत त्यांनी विविध धार्मिक, सामाजिक , शैक्षणिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. शेतीविषयकसुद्धा त्यांचे कार्य असून बी-बियाणे , ऊस लागवड , तूर हरभरा पेरणी व संरक्षण याविषयी त्यांनी मार्गदर्शन केले आहे. पशुपालक व गोपालन विषयसुद्धा त्यांचे कार्य महत्वपूर्ण आहे. दरवर्षी ते सिद्धश्रीरत्न पुरस्कार प्रदान सोहळ्याचेही आयोजन करतात. सोलापूर जिल्ह्यासह कर्नाटक व आंध्र प्रदेशात महास्वामींचे असंख्य भक्तगण आहेत.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!