Share

‘पोलिसांचा पदर सोडून संघर्षाला या, भाजप तुम्हाला जशास तसे उत्तर द्यायला तयार’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : अयोध्येतील राम मंदिराच्या ट्रस्टने जमीन घोटाळा केल्याच्या आरोपामुळे देशभरात खळबळ उडाली होती. याच मुद्यावरून सामनाच्या अग्रलेखातून भाजपवर निशाणा साधण्यात आला होता. त्यामुळे भाजप युवा मोर्चाच्या वतीने शिवसेना भवनावर ‘फटकार’ मोर्चा काढला होता. यावेळी शिवसैनिक आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये एकच धुमश्चक्री उडाली.

भाजपने शिवसेना भवनावर फटकार मोर्चा काढून निषेध करणार होते. भाजपचे युवा मोर्चाचे अध्यक्ष तेजिंदर सिंग तिवाना यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मोर्चेकरी जमा झाल्यानंतर शिवसैनिकांनी शिवसेना भवनाच्या परिसरात गर्दी केली. त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. शिवसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये सुरवातीला बाचाबाची झाली नंतर याच रुपांतर हाणामारीत झाले.

त्यानंतर यावरून आता जोरदार राजकारण तापायला सुरवात झाली आहे. दरम्यान, या वादावर मंत्री अनिल परब यांनी भाजपवर टीका केली होती. यावर आता भाजपचे नेते आणि आमदार प्रसाद लाड यांनी अनिल परब यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. ‘अनिल परब हे सध्या भाजपच्या कार्यकर्त्यांना चेथावणी देण्याचा प्रयत्न करत आहेत.

पोलिसांच्या पदराआड जाऊन भाजपच्या कार्यकर्त्यांवर हल्ला करण्याचे शिवसेनेने बंद करावं, त्यांनी संघर्षासाठी समोर यावं. आम्ही जशाच तसं उत्तर देण्यास खंभीर आहोत, अनिल परब यांनी पोकळ धमक्या आणि चिथावणी देण्याचा मुळीच प्रयत्न करू नये. आम्ही अश्या धमक्यांना मुळीच भिक घालत नाही.’ अशा आशयाचे ट्वीट करून त्यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!