Share

धंदा कसा करावा हे अनिल परब यांच्याकडून शिकावं, भाजपा नेत्याची उपरोधिक टीका

Published On: 

मुंबई : गेले ५ महिने कोरोनाने देशासह जगभरात थैमान घातले आहे. कोरोनाला प्रातिबंध म्हणून ३१ मे पर्यंत देशभरात कडक लॉकडाऊन करण्यात आला होता. यानंतर, जूनपासुन देशात अनलॉकची घोषणा केल्यानंतर टाळेबंदी टप्प्याटप्प्याने उठवण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील ‘पुनःश्च हरिओम’ म्हणत ‘मिशन बिगीन अगेन’ ची घोषणा केली होती.

आता, जनजीवन पूर्वपदावर येत असताना अनेक सामान्य लोकांना प्रवासासाठी अडचणींचा सामना करावा लागत होता. आर्थिक फटका सहन करत खाजगी वाहनांची सोय करून ई-पासचे बंधन देखील पाळावे लागत होते. सरकारने वाढती मागणी पाहता जिल्हाबंदी उठवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, एसटी वाहतूक देखील सुरु झाली असून खाजगी वाहनाने प्रवास करताना मात्र ई-पास लागू होणार आहे. अत्यावश्यक सेवांसाठी सुरु असलेल्या एसटीने आता सर्वसामान्य नागरिकांचा प्रवास सुरु झाला आहे.

‘कोरोना’च्या रुग्णांना खाटा अपुऱ्या पडणार नाहीत याची दक्षता घ्या अजित पवार यांचे आदेश

एसटी महामंडळाची आंतरजिल्हा बस वाहतूक काल (दि. २० ऑगस्ट) पासून सुरु करण्यात आली असून प्रवाशांचा प्रतिसाद हा कमी असल्याचे अनेक भागात दिसून आले. तर, एसटी वाहतूक सुरु केल्यानंतरही खाजगी वाहनांतून प्रवास करायचा असल्यास ई-पासची सक्ती करण्यात आली आहे. भाजपासह मनसेने ई-पास सक्ती विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.

सीबीआय चौकशीमुळे शिवसेनेचे ‘ते’ नेते खुश? भाजपा पदाधिकाऱ्याची टीका

भाजपाचे पदाधिकारी अवधूत वाघ यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांचे कौतुक करत उपरोधिक टीका केली आहे. ” धंदा कसा करावा हे अनिल परब यांच्याकडून शिकाव. एसटी मधुन प्रवास केला तर ई-पास मधुन सुट मिळेल अशी सवलत देऊन त्यांनी खाजगी वाहनचालकांना चाप तर बसवलाच पण एसटीला प्रचंड व्यवसाय मिळवून देऊन त्यांनी लालपरी फायद्यात आणली. #करुन_दाखवल”, असे ट्विट त्यांनी केले आहे.

राष्ट्रवादीला मोठा धक्का, बड्या नेत्याचे कोरोनामुळे निधन

दरम्यान, मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी, ” बाहेर राज्यातील लोक गेले आणि आले सुद्धा आणि आपल्याच राज्यातील जनतेला विविध प्रकारचे नियम आणि अटी का? सरकारने आता अव्यवहार्य विचार करणे थांबवावे व जनतेला होणाऱ्या त्रासाचा विचार करून तातडीने ई-पासचा त्रास थांबवून जिल्हा बंदी उठवावी, ज्याप्रमाणे बस प्रवासात ई-पासची आवश्यकता नाही तर मग खासगी वाहन धारकांना याची सक्ती का?” असा सवाल त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व सरकारला ट्विटरद्वारे केला आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!