अहमदनगर / ऋषिकेश घोगरे : जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच असून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते तथा जिल्हा सरचिटणीस सोमनाथ धूत व अहमदनगर शहर जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब गाडळकर यांचे निधन झाले आहे. नगरमधील दोन चांगल्या कार्यकर्त्यांचा एकाच दिवशी मृत्यू झाल्याने नगरवर शोककळा पसरली आहे. यात सोमनाथ धूत यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे तर बाबासाहेब गाडळकर यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे.
नगर जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच असल्याचे दिसत आहे. दरम्यान, शिवसेनेचे उपनेते माजी आमदार अनिल राठोड, प्रसिद्ध उद्योजक प्रदीपशेठ गांधी यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यातच त्यांचे निधन झाले. आज एकाच दिवशी राष्ट्रवादीने जिल्ह्यातील दोन धुरंधर नेत्यांना गमावले आहे. राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस सोमनाथ धूत, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब गाडळकर (वय 36) यांचे आज सकाळी खासगी रुग्णालयात उपचार घेत असताना निधन झाले.
सोमनाथ धूत हे शरद पवार यांचे विश्वासु मानले जात होते.यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक विविहित मुलगी असा परिवार आहे. तर गाडळकर यांच्या पश्चात वडील, आई, भाऊ, पत्नी, मुलगा, मुलगी, चार बहिणी, वहिणी असा मोठा परिवार आहे. बाबासाहेब गाडळकर हे आ. संग्राम जगताप यांच्या अतिशय जवळचे व विश्वासू मित्र म्हणून ते सर्वपरिचित होते. महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवकांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या यादीत त्यांचे नाव होते. सोमनाथ धूत यांचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्ह्याच्या बांधणीमध्ये मोठे योगदान होते. पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्यासह पक्षाच्या राज्यातील वरिष्ठ नेत्यांसमवेत त्यांचे निकटचे संबंध होते.
पहिला मान सैन्याचा; 50 लाख डोस देण्याचा सरकारचा विचार


