Share

जाणून घ्या लिंबाचे घरगुती उपाय

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : लिंबाचा वापर फक्त खाण्यासाठी नाही तर इतर गोष्टींसाठी देखील केला जातो. लिंबा मधून आपल्याला भरपूर प्रमाणात क जीवनसत्व मिळते. या क जीवनसत्वचा वापर आजारापासून बचाव करण्यासाठी होतो.तसेच  लिंबाचे बरेच घरगुती उपाय देखिल आहेत. ते जाणून घेऊया.

१. हिरड्यांमधून रक्त येत असेल तर लिंबाचा रस बोटावर घेऊन तो दात आणि हिरड्यांना चोळावा रक्त येणे बंद होते.

२. अपचन झाले असेल तर थंड पाण्यात लिंबू पिळून प्यावं. त्यामुळे अपचनाचा त्रास कमी होईल.

३. दररोज एका ग्लास मध्ये लिंबू पिळून प्यावे त्यामुळे पचन क्रिया सुधारते.

४. अंघोळीच्या पाण्यात लिबू पिळून त्या पाण्याने अंघोळ केल्यामुळे त्वचा मुलायम व चमकदार होते.

५. लिंबू नखांवर घासल्यास नखे मजबूत व तजेलदार होतात. तसेच नखे पांढरी शुभ्र देखील राहतील.

६. घरात येणाऱ्या मुंग्यांसाठी घालवण्यासाठी लिंबाचा वापर होतो. लिंबामुळे मुंग्यांची वास घेण्याची ताकत कमी होते.

७. स्वयंपाक घरातील भांड्यांना उग्र वास येत असल्यास त्यांना लिंबू घासून ठेवावे.त्यामुळे भांड्यांना वास येत नाही.

८. हाताला येणार कोणत्याही प्रकारचा वास जात नसेल तर हाताला लिंबू चोळावे.

९. कपड्याला गंज किंवा गरम इस्त्रीचे डाग लागले असतील तर त्या डागांवर लिंबू घासावे डाग कमी होतील.

१०. केस तेलकट असतील तर त्यावर लिंबू चोळावे त्यामुळे केसला  चमक येते.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!