Share

प्रकाश आंबेडकरांवर नाराज असलेल्या लक्ष्मण मानेंनी केली नवीन पक्षाची घोषणा

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्या कार्यपद्धतीवर नाराज होत वंचित बहुजन आघाडीला रामराम ठोकणारे लक्ष्मण माने यांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर नवीन पक्षाची घोषणा केली आहे. महाराष्ट्र बहुजन वंचित आघाडी असे मानेंच्या नव्या पक्षाचे नाव असणार आहे. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत माने बोलत होते.

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडी नावाने तिसऱ्या आघाडीची स्थापना केली. प्रकाश आंबेडकर यांचे सहकारी लक्ष्मण माने हे देखील या आघाडीत होते. मात्र माने यांना प्रकाश आंबेडकर यांची कार्यपद्धती पटत नसल्याने त्यांनी पक्षाला रामराम ठोकला. इतकेच नव्हे तर लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेस – राष्ट्रवादी सोबत आघाडी न करून जे नुकसान झाले आहे ते विधानसभेत होऊ नये यासाठी त्यांनी वान्च्चीत आघाडीला रामराम ठोकण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी म्हंटले होते.

याचदरम्यान माने यांनी पुण्यात पत्रकार परिषदेचे आयोजन केले. त्यावेळी माने यांनी नवीन पक्षाची घोषणा केली आहे. महाराष्ट्र बहुजन वंचित आघाडी असे मानेंच्या नवीन पक्षाचे नाव असणार आहे. इतकेच नव्हे तर माने यांची महाराष्ट्र बहुजन वंचित आघाडी ही आगामी विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडी सोबत आघाडी करणार असल्याचेही त्यांनी म्हंटले. तसेच या आघाडी सोबत अनेक पक्ष संघटना येतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

विशेष म्हणजे लक्ष्मण माने हे वंचित बहुजन आघाडीतून बाहेर पडल्यानंतर माने कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते, यातच त्यांनी नवीन पक्षाची घोषणा केली. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत आणखी एक पक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे दिसून येत आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!