Share

कोरोनाचा विळखा आणखी झाला घट्ट, लातूर जिल्हयात धोका वाढला

Published On: 

लातूर : विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत आज दिनांक 18.05.2020 रोजी एकुण 118 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते. त्यापैकी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील 9 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्यापैकी सर्वच 9 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत.

उपजिल्हा रुग्णालय, उदगीर येथुन एकुण 3 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी असुन त्यापैकी सर्वच 3 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. निलंगा येथुन 8 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्यापैकी 6 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून 2 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. चाकुर येथुन 2, अहमदपुर येथुन एका व्यक्तींचा स्वॅब तपासणीसाठी आला होता त्या सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

काश्मीरमध्ये सुरक्षा रक्षकांना मोठे यश, नावाकदल परिसरात दोन दहशतवाद्यांचा खात्मा

लातुर जिल्हयातील असे एकुण 23 स्वॅब तपासणीसाठी आले होते त्यापैकी 06 व्यक्तींचे अहवाल पॉझिटीव्ह असुन 17व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. तसेच बीड जिल्हयातील 77 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्यापैकी 73 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले असुन 2 व्यक्तींचे अहवाल पॉझिटीव्ह आलेले आहेत व 2 व्यक्तींचे अहवाल (Inconclusive) आले असल्यामुळे त्यांची पुनर्तपासणी करण्यात येणार आहे.

उस्मानाबाद जिल्हयातील 18 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्यापैकी16व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले असुन 2 व्यक्तींचे (Inconclusive) आले असल्यामुळे त्यांची पुनर्तपासणी करण्यात येणार आहे. असे एकुण आज 118 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्यापैकी 8 व्यक्तींचे अहवाल पॉझिटीव्ह आले असुन 04 व्यक्तींचे अहवाल Inconclusive आले असून 106 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत आहेत अशी माहिती विषाणु संशोधन व निदान प्रयोगशाळेचे प्रमुख तथा सहयोगी प्राध्यापक सुक्ष्मजीवशास्त्र विभाग डॉ. विजय चिंचोलकर यांनी दिली.

निलंगा येथील सहा कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण हे मुंबईहून प्रवास करून आलेले आहेत ते कोराळी तालुका निलंगा येथील मूळ रहिवासी असून सध्या ते मुंबईत स्थायिक आहेत तेथून ते प्रवास करून निलंगा येथे दाखल झालेले असून त्यांना निलंगा येथील संस्थात्मक विलीनीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर संजय ढगे यांनी दिली आहे.

#corona : पोलिसांचे आरोग्य धोक्यात, कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ : एकूण आकडा १२७६वर

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!