Share

माथेफिरूने एकतर्फी प्रेमातून मॉडेलला बनवले बंधक, युवतीला सोडविण्याचे पोलिसांचे प्रयत्न सुरु

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : मध्यप्रदेशची राजधानी असलेल्या भोपाळमध्ये माथेफिरू तरूणाने एका मॉडेलला एकतर्फी प्रेमातून बंधक बनवले आहे. या तरूणाने स्वतःलाही रक्तबंबाळ केले आहे. तसेच त्याचे नाव रोहित सिंह असल्याची माहिती समोर आली आहे. रोहित उत्तर प्रदेशातील अलिगढचा राहणारा आहे. ज्या घरात त्याने तरूणीला बंधक बनवले आहे त्या घराबाहेर पोलीस दाखल झाले असून ते त्याला समजावण्याचा प्रयत्न करत आहेत. एएनआयने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

ही युवती BSNLच्या निवृत्त एजीएमची मुलगी आहे. आणि ती आत त्या युवकाच्या इमारतीच्या 5 मजल्यावर त्याच्या खोलीत बंद आहे. या युवतीला सुखरूप बाहेर काढण्यासाठी पोलिसांकडून रेस्क्यू ऑपरेशन करण्यात येत आहे. सुत्रांच्या माहितीनुसार रोहित हा या युवतीला आधीपासूनच ओळखतो आणि गेल्या अनेक दिवसांपासून तो तिला लग्नासाठी जबरदस्ती करत आहे. पण युवतीचा नकार असल्यामुळे तिच्यावर दबाव टाकत तिला त्याने त्याच्या घरात कैद करून ठेवलं आहे. पोलिसांना या प्रकाराची माहिती मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले. पण पोलिसांनी जर घरात येण्याचा प्रयत्न केला तर मी स्वत:ला गोळी जाडून घेईन अशी धमकी रोहितने दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहित मुंबईत मॉडेलिंग करतो. मुंबईतच त्याची आणि पीडित मुलीची ओळख झाली. शुक्रवारी सकाळी ७ वाजल्यापासून एकतर्फी प्रेमातून त्याने या तरूणीला बंधक बनवले आहे. तरूणीने माझ्याशी लग्न केले नाही तर मी स्वतःवर गोळी झाडून घेईन अशी धमकी रोहितने दिली आहे.रोहित या माथेफिरू तरूणाकडे एक कात्री आणि एक देशी कट्टा असून रोहित व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून पोलिसांशी बोलतो आहे. पोलीस त्याला समजावण्याचा आणि मुलीची सुखरूप सुटका करण्याचा प्रयत्न करत आहेत.

बाष्कळ विदर्भाला वेगळे राज्य हवंय, पण ते वढू रायगडाला मान्य नाही – भिडे गुरुजी

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!