Share

‘आयुष्यमान भारत’मुळे देशातील 50 कोटी जनतेला मोठा दिलासा : देवेंद्र फडणवीस

Published On: 

🕒 1 min read

ठाणे : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील आयुष्यमान भारत योजनेमुळे देशातील 50 कोटी जनतेला उपचारांवरील खर्चातून मोठा दिलासा मिळणार असून रिलायन्ससारख्या हॉस्पिटल्सने देखील सर्वसामान्य जनतेला उत्तम आणि आधुनिक सेवा देऊन या ‘मोदी केअर’ मध्ये योगदान द्यावे असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोपरखैरणे येथील रिलायन्स हॉस्पिटलचे उद्घाटन झाले, त्यावेळी ते बोलत होते.

सरकार उच्च दर्जाच्या आणि परवडणाऱ्या सार्वजनिक आरोग्याच्या पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी प्रयत्न करीत आहे असं सांगून मुख्यमंत्री म्हणाले की,गेल्या काही वर्षांमध्ये निदान केंद्रे आणि सुविधांमध्ये लक्षणीय वाढ झाल्याने विविध रोगांविषयी माहिती होऊन त्यावरील उपचारही उपलब्ध होत आहेत. आज आपल्या देशात विशेषतः मुंबईत वैद्यकीय उपचारांसाठी इतर देशांतून रुग्ण येण्याचे प्रमाण वाढले आहे, लोकांना मग ते श्रीमंत असो वा गरीब चांगली आरोग्यसेवा मिळालीच पाहिजे. परवडणारी आणि सहज उपलब्ध असणारी वैद्यकीय सेवा ही आवश्यक बाब असून हेल्थकेअर क्षेत्रात आणखीही मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक वाढणे गरजेचे आहे, जेणेकरून नोकरीच्या संधीसुद्धा वाढतील.

रिलायन्सच्या या हॉस्पिटलमध्ये जनरल वॉर्डसुद्धा इतक्या चांगल्या पद्धतीने सुसज्ज केला आहे की, तेथील रुग्णदेखील तिथले वातावरण पाहून लवकर बरा होईल, या हॉस्पिटलमध्ये सर्वांना समान दर्जाच्या सेवा व उपचार मिळणार आहेत ही निश्चितच समाधानाची बाब आहे असं ते म्हणाले.

रिलायन्सच्या या उपक्रमात राज्यात अगदी छोट्या शहरांतही येणाऱ्या काळात 19 कॅन्सर वरील उपचार केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत, याबद्धल मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केले. कॅन्सरचे वाढते प्रमाण पाहता याची मोठी आवश्यकता आहे. या समूहाची ही मोठी झेप ठरेल असंही ते म्हणाले. उत्तर प्रदेश नंतर महाराष्ट्रात कॅन्सरचे प्रमाण सर्वाधिक आहे अशी माहितीही त्यांनी दिली.

याप्रसंगी हॉस्पिटलच्या अध्यक्ष टीना अंबानी, अनिल अंबानी, डॉ रामनारायणन, तुषार मोतीवाला त्याचप्रमाणे खासदार राजन विचारे, आमदार आशिष शेलार, संदीप नाईक, महापौर जयवंत सुतार आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना टीना अंबानी यांनी राज्यातील आरोग्य क्षेत्रात बदल घडवून आणण्यासाठी आणि एकूणच आरोग्यसेवेची घडी सुरळीत राहावी म्हणून मुख्यमंत्री करीत असलेल्या प्रयत्नांची प्रशंसा केली. हे रुग्णालय केवळ नवी मुंबई किंवा मुंबईतील लोकांसाठी नसून देशातील जनतेसाठी आहे असे त्या म्हणाल्या. वैद्यकीय सेवा देताना मानवता आणि जीव वाचविणे हे आमच्या समोरचे पहिले उद्दिष्ट आहे असे त्या म्हणाल्या.

हॉस्पिटलची वैशिष्ट्ये

• आंतरराष्ट्रीय दर्जाचे, सुसज्ज

• अत्याधुनिक साधनसामुग्री

• संसर्ग होऊ नये म्हणून सुसज्ज रुम

• 36 स्पेशल विभाग

• 125 तज्ज्ञ डॉक्टर आणि 225 बेड्स

• 4 आंतराष्ट्रीय गुणवत्तेचे ऑपरेशन थिएटर

• रेडिएशन टेक्नोलॉजीसह अत्याधुनिक सुविधा

 

बाष्कळ विदर्भाला वेगळे राज्य हवंय, पण ते वढू रायगडाला मान्य नाही – भिडे गुरुजी

राज्यात राजकीय भूकंपाची शक्यता ; महादेव जानकर यांच्या उमेदवारीवर अजून निर्णयच नाही

56 इंचाच्या छातीपेक्षा, छातीवर मेडल्स असणारी माणसे जास्त महत्वाची – उद्धव ठाकरे

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!