मुंबई : शिवसेनेचे मुखपत्र ‘सामना’च्या संपादकपदी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांची नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर रश्मी ठाकरे यांना ‘सामना’चे संपादक केल्यानंतर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले होते. कारण आजपर्यंत त्यांच्याकडे शिवसेनेतले कुठलेही पद सोपवण्यात आले नव्हते. मात्र आज झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी याचा खुलासा केला.
उद्धव ठाकरे म्हणाले, पत्रकारांच्या मनात अनेक प्रश्न आहेत. मात्र आम्ही त्याचं नेहमी उत्तर देऊ शकत नाही. माझ्याकडे मुख्यमंत्री पदाची जबाबदारी अनपेक्षित आली. सामना, शिवसेना आणि ठाकरे हे तिन्ही वेगळे होऊ शकत नाहीत. म्हणून रश्मी ठाकरे यांना संपादकपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.”
तसेच सामनाची भाषा ही पितृभाषा आहे. तिची भाषा आणि दिशा कधीही बदलणार नाही. सामनाचे संपादक पद जरी रश्मी ठाकरे यांच्याकडे असले तरी संपादकीय ची जबाबदारी संजय राऊत यांच्याकडेच राहील. असेही ठाकरे यांनी स्पष्ट केले.
सामनातील अग्रलेखाची भाषा ही पितृभाषा असल्याने ती कामय राहील. ‘उद्या असे म्हणू नका; रश्मी ठाकरेंनी उद्धव ठाकरेंवर टीका केली,’ असे सांगतानाच सामनाच्या नव्या संपादक रश्मी ठाकरे या आपल्यावरही निशाणा साधू शकतात, असेही मुख्यमंत्री ठाकरे यांनी यावेळी बोलताना सूचित केले.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

