Share

संचारबंदीत पारनेरच्या दमदार तहसीलदार ज्योती देवरे यांची धडक कारवाई..

Published On: 

पारनेर : सध्या बहू चर्चित कोरोनो आजाराच्या प्रसारासाठी अटकाव म्हणून राज्य सरकारने संपुर्ण राज्यात दि. 23 पासून संचारबंदी लागू केलेली आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यातील प्रत्येक जिल्हा व तालुका स्तरावर पोलीस प्रशासन आपल्याला दिलेल्या अधिकारा प्रमाणे शहरात व ग्रामीण भागात काम करत आहेत. मात्र शहराप्रमाणे ग्रामीण भागातही लोकं प्रवास करण्याचे टाळत नसून गाफील पणे दुचाकीवर विनाकारण घराबाहेर पडत आहेत,. अश्या लोकांवर पोलीस थेट लाठी चार्ज करून लोकांना समज देत आहेत.

• पारनेरच्या दमदार तहसीलदार :

पारनेर तालुकयातील दमदार व सिंघम लेडी समजल्या जाणाऱ्या तहसीलदार ज्योती देवरे ह्या पारनेर शहरात सकाळपासून हातात काठी घेऊन आपले कर्तव्य बजावत आहेत. तालुक्यातील पारनेर शहर, टाकळी ढोकेश्वर, अळकुटी, लोणीमावळा, निघोज, भाळवणी, कान्हूर पठार आदि महत्वाच्या ठिकाणी तहसीलदार ज्योती देवरे यांच्या आदेशानुसार पोलीस प्रशासन कार्यरत आहेत. तहसीलदार स्वतः ह्या संचारबंदीत उभ्या ठाकल्या असून आपले कर्तव्य बजावताना दिसत आहेत. मात्र जनतेने प्रशासनाला सहकार्य करावे अशी भावना तहसीलदार ज्योती देवरे यांनी माध्यमाशी व्यक्त केली.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!