Share

सलमानचा मुक्काम आजही तुरुंगातच ; जामीन अर्जावर उद्या सुनावणी

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : काळवीट शिकारप्रकरणी पाच वर्षांची शिक्षा सुनावलेला अभिनेता सलमान खानच्या जामीन अर्जावर आज जोधपूर सत्र न्यायालयात सुनावणी होणार होती. सलमान खानला आज जामीन मिळतो, की तुरुंगातला त्याचा मुक्काम वाढतो, याकडे सर्वांचं लक्ष लागलं होत. मात्र, सलमानला आजही तुरुंगात रहावं लागणार, जामीन अर्जावर उद्या सुनावणी होणार आहे. सलमान खानचा जामीन अर्जावरचा निर्णय़ उद्यापर्यंत राखून ठेवला आहे.

काय आहे प्रकरण ?

कांकाणी गावात दोन काळवीट शिकार केल्याचं हे प्रकरण आहे. सलमानने १९९८ मध्ये एक आणि दोन ऑक्टोबरच्या रात्री विविध ठिकाणी काळवीटाची शिकार केल्याचा आरोप आहे.गोळीचा आवाज ऐकून ग्रामस्थ घटनास्थळी आले. तेव्हा सलमानने इतर कलाकारांसोबत गाडीतून पळ काढला, तर दोन्ही हरणांचे मृतदेह तिथेच पडून होते. याप्रकरणी सलमान दोषी ठरला आहे.दरम्यान, कोर्टानं शिक्षा सुनावण्याआधी जेव्हा सलमान आणि इतर आरोपींना आपलं म्हणणं मांडण्याची संधी दिली, तेव्हा सर्वांनीच आपल्यावरचे आरोप नाकारले होते.आपण काळविटाची शिकार केली नाही, त्यात आपला कुठलाही हात नाही, असं म्हटलं होतं.मात्र कोर्टानं त्यानंतर सलमान खानला दोषी ठरवत असल्याचं जाहीर केलं. तर इतर आरोपींना केवळ पुराव्याअभावी निर्दोष सोडलं.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!