🕒 1 min read
मुंबई : गुढीपाडवा मेळाव्यात आज राज ठाकरेंची तोफ कुणावर धडाडणार याकडे सर्वांच लक्ष लागले आहे. मनसेचा गुढीपाडवा मेळावा आज दोन वर्षांनंतर मुंबईच्या शिवाजी पार्कमध्ये पार पडणार आहे. या मेळाव्यासाठी मनसेकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे. राज ठाकरे याठिकाणी मनसैनिकांना संबोधित करणार असल्याची माहिती आहे.
9 मार्चला मनसेच्या 16 व्या वर्धापन दिनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली होती. त्यावेळी “हा तर ट्रेलर आहे, पिक्चर अजून बाकी आहे, तो 2 एप्रिलला शिवतीर्थावर दाखवेन” असं सूचक वक्तव्य केलं होतं. त्यामुळे आजच्या मेळाव्यात राज ठाकरेंची तोफ कुणावर धडाडणार, राज ठाकरे कोणती घोषणा करणार याकडे लक्ष लागलं आहे.
तसेच राज ठाकरे पुढे म्हणाले, “राज्यात सत्ताधारी पक्षांकडून काहीच काम होत नाहीत. विरोधक आणि सत्ताधारी एकमेकांना संपवण्याचे कारस्थान करत आहेत. यामध्ये सामान्य जनता मात्र मनसेकडून मदत मागत असल्याचं मत राज ठाकरेंनी पुण्यातील सभेत व्यक्त केले होते आणि आगामी महापालिका निवडणुकीत महाराष्ट्रात मनसेच एक सक्षम पर्याय असू शकेल”, असा विश्वास देखील सर्वसामान्यांना देण्याचा प्रयत्न त्यांनी त्यावेळी केला.
महत्वाच्या बातम्या –
आर्यन खान ड्रग्ज प्रकरणातील NCB पंच प्रभाकर साईलचा मृत्यू; मोहित कंबोज यांनी केली ‘ही’ मागणी
“मेट्रोच्या कामाला भाजपने गती दिली आणि अंतीम टप्प्याकडे नेले”; भाजपकडून दावा!
गुढीपाडव्यानिमित्त शिवाजी पार्क आणि शिवसेना भवनासमोर मनसेची बॅनरबाजी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
“गुढी उभारू आरोग्य सुविधांची, बळीराजाच्या सौख्याची…”, राष्ट्रवादीच्या अनोख्या शुभेच्छा
आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मुंबई मेट्रोचं उद्घाटन; फडणवीसांना निमंत्रण न दिल्याने लढाई..
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
