Share

मिका सिंगवर गाण केल्यानंतर केआरकेचे युट्यूब चॅनल ब्लॉक

Published On: 

मुंबई : अभिनेता कमाल रशिद खान नेहमी त्याच्या वक्तव्यामुळे चर्चेत असतो. मात्र त्याच्या या वक्तव्यामुळे तो अनेकवेळा अडचणीत देखील सापडला आहे. ‘राधे’ चित्रपटाच्या रिव्ह्यू संदर्भात अभिनेता सलमान खानने मुंबई कोर्टात केआरकेवर मानहानीचा दावा केला. यासंदर्भात अभिनेता कमाल रशिद खानला नोटीस पाठवण्यात आली. त्या नंतर सर्वत्र या प्रकरणाची चर्चा सुरु झाली.

तसेच काही दिवसांपासून बॉलिवूड गायक मिका सिंग आणि केआरकेमध्ये वाद सुरु आहेत. केआरकेने सोमवारी त्याच्या युट्यूब चॅनलवर ‘सुअर’ नावाने एक गाणं प्रदर्शित केले होते. या आधी मिकाने ११ जून रोजी ‘केआरके कुत्ता’ हे गाणं प्रदर्शित केलं होतं. त्यानंतर मिका सिंग आणि केआरकेमध्ये सतत वाद सुरु असल्याचे दिसते.

आता केआरकेने मिका सिंगवर एक गाणं तयार केलं आहे. केआरकेच्या त्या गाण्यावर कारवाई करत युट्यूबने हे गाणं काढलं असून केआरकेच्या युट्यूब चॅनलला एक आठवड्यासाठी ब्लॉक केले आहे. दरम्यान, हे पाहता केआरकेने युट्यूबवर निशाना साधत मिका सिंगसोबत असे का केले नाही असा प्रश्न विचारला आहे.

केआरकेने ट्वीट करत सांगितले की, ‘तुम्ही वेगवेगळ्या लोकांसाठी वेगवेगळे नियम वापरतात हे सिद्ध झालं आहे. आता पर्यंत शेकडो लोकांनी त्यांच्या व्हिडीओमध्ये माझा फोटो आणि व्हिडीओ फुटेज वापरले आहेत. परंतु तुम्ही माझी तक्रार कधीही स्वीकारली नाही. याचा अर्थ असा आहे की मला त्रास देण्यासाठी तुम्ही त्यांची मदत करताय.’

पुढे केआरके मिकाच्या ‘केआरके कुत्ता’ या गाण्याची लिंक शेअर करत म्हणाला, ‘हा व्हिडीओ त्रास देण्या योग्य नाही, त्यांनी तर माझे फोटो आणि व्हिडीओ वापरले आहेत. परंतु माझा व्हिडीओ हा त्रास देण्यासारखा आहे. इथे मी फक्त त्याच्या फोटोंचा वापर केला आहे. याचा अर्थ युट्यूब आणि टीम युट्यूब मला त्रास देण्यासाठी त्याला मदत करत आहेत. कोर्टात भेटू,’ असा एक इशारा त्याने दिला आहे.

मात्र केआरकेला ‘राधे’ चित्रपटाच्या रिव्हू साठी नाही तर कमाल खानने सलमान खान आणि त्याच्या अनेक गोष्टींविरोधात केलेल्या बदनामीमुळे मानहानीची केस करण्यात आली, असा खुलासा वकिलाने  केला होता. यात त्याच्या वकिलाने म्हटलं होते की, ‘कमाल खान सातत्याने सलमान खानची बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच बदनामी करण्याच्या हेतूने खोटे आरोपही करत आहे. याशिवाय तो सलमान खानचा ब्रँड बीइंग ह्युमनलाही तर फ्रॉड म्हटला आहे. तसेच या ब्रँडतर्फे पैसे दाबले गेले असही त्याने म्हटलं होत.’ तसेच त्याने ‘सलमान खान आणि सलमान खान फिल्म्स हे एक गुंड आहेत.’अशीही बदनामी केली होती.

महत्वाच्या बातम्या 

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!