Share

बदली रोखण्यासाठी कृष्णप्रकाश यांच्या हालचाली? शरद पवारांची घेतली भेट

Published On: 

पुणे : आयर्नमन म्हणून प्रसिद्ध असलेले आयपीएस अधिकारी कृष्णप्रकाश यांनी नुकतेच शरद पवार यांची भेट घेतली. नुकत्याच झालेल्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचा बदल्यांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी ही भेट घेतली आहे. नुकतीच त्यांची पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त पदावरून बदली झाली होती. आज सकाळी कृष्णप्रकाश अचानकच गोविंदबाग येथे आले. त्यांनी शरद पवार यांच्याशी चर्चा केली. दोघांमध्ये जवळपास दहा ते पंधरा मिनिटे संवाद सुरु होता. आता त्यांनी नेमकी कोणत्या गोष्टीवर चर्चा केली हे मात्र समजू शकलेले नाही. नेमकी कशाची चर्चा झाली, याची माहिती देण्यास त्यांनी नकार दिला. ही खासगी भेट होती, असे त्यांनी सांगितले.

शरद पवार यांनी ही यावेळी माध्यमाशी संवाद साधले नाही. त्यांना कोल्हापूरला जायचे असल्याने, ते त्याच कामात होते. दुसरीकडे अंकुश शिंदे यांनी पदभार स्वीकारल्याने आता या भेटीचे नेमके काय कारण असू शकेल, याचीही चर्चा सुरु झाली होती. कृष्णप्रकाश यांना बदल्यांच्या बाबतीत कसलीही माहिती नव्हती, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. कारण बदली झाली तेव्हा ते परदेशात होते. एकंदरीत बदल्यांच्या या मुद्यावरच कृष्णप्रकाश यांनी भेट घेतली होती का ? अशी चर्चा सुरु आहे.

 महत्त्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!