Share

‘स्वाभिमान’चे १०० रुपयांत कोकणात चला’, बाप्पाच्या जयघोषात कोकणवासीय निघाले गावाला

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा- गणपती बाप्पा मोरया, असा जयघोष करत मुंबई व उपनगरांतून बुधवारी २८ ऑगस्ट रोजी कोकणसाठी स्वाभिमान पुरस्कृत बसेस रवाना झाल्या. कणकवली, देवगड, वैभववाडी विधानसभेचे आमदार नितेश राणे यांच्या संकल्पनेतून‘१०० रुपयांत कोकण’ या अभिनव उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे.

गणेशोत्सवासाठीकोकणात दरवर्षी जाणाऱ्यांची संख्या लाखोंच्या घरात असल्याने रेल्वे व एसटीचे आरक्षणही पटकन फुल्ल होते. खासगी वाहतूकदारही १००० ते १२०० रुपये तिकीट आकारून लूट करतात. अशावेळी आमदार नितेश राणे यांनी फक्त १००रुपयांत सलग ६व्या वर्षी कोकणचा सुखकर प्रवास उपलब्ध करून दिला आहे.

२८ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट दरम्यान एकूण १०० बसेस मुंबईतून सोडण्यात येणार आहेत. त्यानुसार आज पहिल्या दिवशी दादर आणि बोरिवली भागातून बसेस सोडण्यात आल्या. यावेळी महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष मुंबई अध्यक्ष राजेश हाटले व इतर सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

दरम्यान, गणेशोत्सवाच्या काळात कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफी दिली आहे. कोकणात जाणाऱ्या वाहनांना ३० ऑगस्ट ते १२ सप्टेंबर या कालावधीमध्ये टोलमाफी करण्यात आली आहे. टोलमाफीचे स्टिकर्स हे ३० ऑगस्टपासून जवळच्या पोलिस स्थानकात किंवा प्रादेशिक परिवहन कार्यालयात उपलब्ध होणार आहेत अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. त्यामुळे कोल्हापूर आणि मुंबई गोवा मार्गे कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी ही टोलमाफी असणार आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!