Share

कोलकाता उच्च न्यायालयाने रद्द केला तृणमुलच्या मंत्र्यांसह चार नेत्यांचा जामीन

Published On: 

कोलकाता – नारदा स्टिंग ऑपरेशन प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागानं, म्हणजेच सीबीआयनं अटक केलेल्या पश्चिम बंगालच्या चार नेत्यांना मिळालेल्या जामिनाला कलकत्ता उच्च न्यायालयानं स्थगिती दिली आहे. सुव्रत मुखर्जी, फिरहाद हकीम, मदन मित्रा आणि सोवन चटर्जी या तृणमूल कॉंग्रेसच्या नेत्यांना विशेष सीबीआय न्यायालयानं काल संध्याकाळी जामीन मंजूर केला होता. मात्र, त्यानंतर काही तासांतच उच्च न्यायालयानं या जामिनाला स्थगिती देत त्यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

चारही नेत्यांना प्रेसिडेन्सी तुरुंगात नेण्यात आलं असून या प्रकरणाची पुढील सुनावणी उद्या होणार आहे. नारदा न्यूज या संकेतस्थळाच्या मॅथ्यू सॅम्युएल यांनी केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये हे चौघेही नेते लाच घेताना कॅमेरामध्ये कैद झाले होते. सीबीआयने सोमवारी छापेमारीनंतर या सर्व नेत्यांना अटक केली होती.

सीबीआयच्या या कारवाईनंतर, बंगालमधील पराभव पचवणे मोदी सरकारला जड जात असल्यामुळेच ते अशा प्रकारची बदल्याची कारवाई करत असल्याचे तृणमूलने म्हटले आहे.दरम्यान, ही कारवाई भाजप पुरस्कृत असल्याचा आरोप करत टीएमसी कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. तृणमूल काँग्रेसचे कार्यकर्ते दुपारी सीबीआयच्या कार्यालयाबाहेर धडकले तेव्हा निदर्शने करण्याबरोबरच दगडफेक केली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!