नवी दिल्ली- जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाचे दर वधारल्याच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांकडून मंगळवारी इंधन दरात वाढ करण्यात आली. तेल कंपन्यानी पेट्रोल दरात 27 पैशांची तर डीझेल दरात 29 पैशांची वाढ केली आहे. ताज्या दरवाढीनंतर देशाची राजधानी दिल्लीत पेट्रोलचे प्रती लीटरचे दर 92.85 रुपयांवर तर डीझेलचे दर 83.51 रुपयांवर गेले आहेत.
कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे देशातील बहुतांश राज्यांमध्ये लॉकडाऊन सुरु आहे. त्याचा परिणाम उद्योगावर झाला आहे. त्यामुळे केंद्र सरकारला मिळणाऱ्या उत्पन्नात घट झाली आहे. पेट्रोल, डिझेलवरील करातून केंद्र सरकारला मोठ्या प्रमाणावर महसूल मिळत असतो. या महसूलासाठीच केंद्र सरकारकडून पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीकडे दुर्लक्ष केले जात आहे असा आरोप होत आहे.
दरम्यान, कच्चे तेल आणि पेट्रोलियम पदार्थांच्या किंमती वाढल्याने हा महागाई दर वाढल्यामुळे महागाई देखील वाढू लागली आहे. केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्रालयाकडून घाऊक महागाईच्या दराची आकडेवारी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. घाऊक बाजारात महागाई दर पाहता चिंता वाढली आहे.
मार्च महिन्याच्या तुलनेत एप्रिल महिन्यातील महागाई दर वाढला आहे. मार्च महिन्यात महागाई दर हा 7.39 टक्के इतका होता, तर एप्रिलमध्ये या दराने रेकॉर्ड मोडला आहे. महागाई दर तब्बल 10.49 टक्क्यांवर पोहोचला आहे. महागाई दरात एका महिन्यात जवळपास 3.1 टक्क्यांची वाढ झाली आहे.
महत्वाच्या बातम्या
- कोकणातील उन्मळून पडलेल्या फळ झाडांचे शास्त्रोक्त पुनर्जीवन करा – आशिष शेलार
- जयंत पाटलांनी संभाव्य पूरपरिस्थितीचा धोका लक्षात घेत प्रशासनाला लावले कामाला
- आर अश्विनकडून नकळत झाली मोठी चूक ; सोशल मीडियावर मागितली सर्वांची माफी
- चंद्रपूर शहरात पाणी टंचाई निर्माण होवू नये यासाठी जोगरेवारांनी दिला 1 करोड 49 लाखांचा निधी
- तौक्ते चक्रीवादळाने झालेल्या नुकसानीचे त्वरीत पंचनामे करुन नुकसानभरपाई द्यावी : कॉंग्रेस


