Share

खा. माने यांच्या समोरच आंदोलक महिलांनी घेतल्या नदीत उड्या

Published On: 

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांनी मायक्रो फायनान्स कंपनीकडून घेतलेले कर्ज माफ व्हावे, या मागणीसाठी महिलांनी गांधीनगरजवळ असलेल्या पंचगंगा नदीच्या तीरावर जल आंदोलन पुकारले आहे. या आंदोलक महिलांची भेट घेण्यासाठी खासदार धैर्यशील माने गेले असता त्यांच्यासमोरच काही आंदोलक महिलांनी पाण्यात उड्या मारल्याची घटना शुक्रवारी घडली.

कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात आलेल्या महापुरामुळे या भागातल्या महिलांचे संसार उघड्यावर पडले, शेती उद्धवस्त झाली मोठं आर्थिक नुकसान झालं. त्यामुळे या महिलांना त्यांचं ते कर्ज फेडणं शक्य झालं नाही. शेतकऱ्यांना जशी कर्जमाफी मिळाली तशीच कर्जमाफी आम्हालाही मिळावी अशी मागणी या महिलांनी केलीय. त्यासाठी बचत गटाच्या महिला पंचगंगा नदीच्या काढावर आंदोलनाला बसल्या होत्या. त्याच दरम्यान महिलांनी हे टोकाचं पाऊल उचललं.

गेल्या काही दिवसांपासून आंदोलनाला बसलेल्या या महिलांची भेट घेण्यासाठी खासदार धैर्यशील माने आले होते. माने हे महिलांशी चर्चा करत असतानाच संतप्त झालेल्या काही महिलांनी थेट नदीपात्रातच उड्या घेतल्या. कर्जमाफी द्या नाही आम्ही नदीच्या पाण्यात जीवाचं बरं वाईट करतो असं त्या सांगत होत्या. महिलांच्या या पावित्र्यामुळे तिथे एकच खळबळ उडाली. खासदार माने यांच्यासह तिथं असलेल्या पोलीस आणि प्रशासनाची एकच धावपळ उडाली.

यावेळी उपस्थित पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली. खासदार धैर्यशील माने स्वत:ही पाण्यात उतरुन आंदोलक महिलांना बाहेर येण्याचं आवाहन करत होते. शिवाय पोलिसांनीही पाण्यात उतरुन महिलांना नदीबाहेर आणलं.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!