Share

‘रणमशिन’ कोहली ठरला ‘या’ बाबतीत एकमेव कर्णधार

Published On: 

मुंबई : तीन दिवसानंतर इंग्लंडमध्ये भारत आणि न्युझीलंड संघादरम्यान जागतीक कसोटी चॅम्पीयनशीप स्पर्धेचा अंतिम सामना खेळवीला जाणार आहे. या सामन्यासाठी भारत आणि न्युझीलंड संघ सज्ज आहेत. या सामन्याची उत्सुकता अंत्यत शिगेला पोहोचली आहे.

डब्ल्युटीसीच्या या अंतिम सामन्यापुर्वी इंग्लंड आणि न्युझीलंड संघादरम्यान दोन कसोटी सामन्याची मालिका खेळवण्यात आली होती. या मालिकेत न्युझीलंडच्या संघाने इंग्लंडचा १-० अशा फरकाने पराभव केला. या पराभवासह इंग्लंडचा कर्णधार जो रुटने पहिल्यांदा घरच्या मैदानावर कसोटी मालिका गमावली. यासह भारतीय कर्णधार विराट कोहली हा एकमेव कर्णधार आहे ज्याने मायदेशात एकही मालिका गमावली नाहीये. त्याच्या व्यतिरिक्त इतर कर्णधारांनी किमान एकदातरी घरच्या मैदानावर कसोटी मालिका गमावली आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील प्रमुख कर्णधारापैकी केन विल्यमसन, जो रुट, स्टीव स्मिथ आणि विराट कोहली या पैकी विराट हा एकमेव कर्णधार आहे ज्याने घरच्या मैदानावर एकही कसोटी मालिका गमावली नाही. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव स्मिथने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिकेत पराभूत झाला होता. तर, केन विलियम्सनच्याच नेतृत्वात न्यूझीलंडला दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध कसोटी मालिका गमवावी लागली होती. तर आता जो रुटने घरच्या मैदानांवर न्युझीलंड विरुद्ध कसोटी मालिका गमावली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!