औरंंगाबाद : मला न विचारता माझी गाडी का घेऊन गेला अशी विचारणा करणा-या गाडी मालकांवर चाकू हल्ला केल्याची घटना गुलाबवाडी आदर्शनगर येथे ११ मे रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली. उत्तम बाबासाहेब येटाळे (वय २९,रा. जयभीमनगर हाऊनहॉल) असे जखमी झालेल्या दुचाकी मालकाचे नाव आहे.
उत्तम येटाळे याने त्याची दुचाकी घरासमोर उभी केली होती. ही दुचाकी त्याला न विचारता परस्पर ऋतिक दाहिजे आणि गोट्या चोथमल (दोघे रा. जयभीमनगर, टाऊनहॉल) यांनी नेली होती. मला न विचारता दुचाकी का घेऊन गेला अशी विचारणा उत्तम येटाळे यांनी केली.
त्यानंतर दोघांनी हातचापट्याने मारहाण करून थेट चाकू हल्ला केला. तर एकाने येटाळे यांच्या डोक्यात फरशी मारून जखमी केले. उत्तम येटाळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून चाकू हल्ला करणा-याविरूध्द बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या
- दोस्ताना नंतर कार्तिकच्या हातात बिग बजेट सिनेमा ; मराठी दिग्दर्शकासोबत करणार काम
- बॉलीवूडमध्ये टिकणे झाले अवघड, कंगनाच्या हातातून निसटले अनेक ‘एंडोर्समेंट’
- महागाईचा निषेध करत पुण्यात महिला राष्ट्रवादी काँग्रेसने घातले गॅस सिलेंडरचे व टू व्हिलर गाडीचे श्राद्ध
- जालन्यातील तरुणीचा लग्नाच्या नावाखाली मालेगावच्या तरुणाला पाच लाखांचा गंडा
- UPSC ची पूर्वपरीक्षा कोरोनामुळे लांबणीवर; आयोगाने नवी तारीखही केली जाहीर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

