🕒 1 min read
तिरुवनंतपुरम: महागाई मुळे सामन्यांच्या खिशाला दररोज कात्री लागत असताना गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेली इंधन दरवाढ आज देखील कायम आहे. शंभरीच्या जवळ गेलेल्या पेट्रोल आणि डीझेल मध्ये सातत्याने वाढ कायम आहे. काही शहरांमध्ये पेट्रोलने या आधीच शंभरी पार केली आहे. या विरोधात सामान्यांसह विरोधी पक्ष देखील आक्रमक होत आहेत.
या इंधन दरवाढी वरून विरोधक केंद्र सरकारवर निशाणा साधत असून केरळ सीक्रेटच्या बाहेर इंधन दरवाढीविरोधात तिरुअनंतपुरमचे कॉंग्रेसचे खासदार शशी थरूर आणि अन्य कार्यकर्त्यांनी निषेध नोंदविला. यावेळी त्यांनी वाहनांना दोऱ्याबांधून ओढले आहे.
#WATCH | Kerala: Shashi Tharoor, Congress MP from Thiruvananthapuram, and other party workers protest against fuel price rise, outside Kerala Secretariat pic.twitter.com/2F2pKTwNIh
— ANI (@ANI) February 26, 2021
दरम्यान, आगामी काळात केरळ विधानसभा निवडणुका आल्या असून सत्ताधारी-विरोधक एकमेकांना खिंडीत पकडण्याची एकही संधी सोडत नसल्याचे चित्र आहे.देशभर सध्या इंधन दरवाढीचा मुद्दा गाजत आहे. कॉंग्रेस केंद्र सरकारकडून होत असलेल्या पेट्रोलच्या दरवाढीचा सतत विरोध करत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- रस्त्यावर तलवारीने केक कापने महागात, १३ जणांवर गुन्हा
- युवराज सिंगची खेळपट्टीवर टीका; मायकेल वॉनची म्हणाला…
- थेट हात जोडत सुभाष देसाई यांनी वनमंत्री राठोड यांच्यावर बोलण टाळल
- प्रियदर्शिनीतील झाडांची काळजी शिवसेना घेईल-पालकमंत्री देसाई
- ‘कसोटी सामान दोन दिवसात संपवला आता अदानी पोर्ट, रिलायन्स रिफायनरीत फिरायला जा’ ! जाफरची मजेशीर स्टोरी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
