Share

दोन कोटींच्या बियाणांच्या वादात व्यापाऱ्यासह मुलावर चाकू हल्ला

Published On: 

औरंगाबाद : आपसातील कांदा बियाणे खरेदी- विक्रीतील पैशांच्या व्यवहारातून एकावर चाकु हल्ला करण्यात आला. ही घटना गुरुवारी (दि. २४) सायंकाळी ६ वाजेच्या सुमारस तालुक्यातील देऊळगाव बाजार येथे घडली. या चाकु हल्यात एक जण गंभीर जखमी झाला असून फिर्यादी व आरोपी सख्खे भाऊ आहे. या प्रकरणी ७ जणांविरोधात सिल्लोड ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना अटक करण्यात आली आहे.

सय्यद उसामा सय्यद रब्बानी असे चाकु हल्यात जखमी झालेल्याचे नाव आहे, तर सय्यद रब्बानी सय्यद इब्राहिम, सय्यद अजीम सय्यद रब्बानी, सय्यद नाजीम सय्यद रब्बानी, सय्यद जाकीर सय्यद रब्बानी, सय्यद जाफर सय्यद रब्बानी, सय्यद रईस सय्यद रब्बानी, सय्यद अबुजर सय्यद रब्बानी सर्व रा. देऊळगाव बाजार असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

सय्यद रफिक सय्यद इब्राहिम रा. शाहूनगर, सिल्लोड यांनी या प्रकरणी फिर्याद दिली. ते आणि त्यांचा सख्खा भाऊ सय्यद रब्बानी हे कांदा बियाण्यांचा खरेदी- विक्रीचा व्यवसाय करतात. चार महिन्यापूर्वी त्यांच्या भावाला त्यांनी अंदाजे दोन कोटींचे कांदा बियाणे विकलेले आहे. गुरुवारी ते कुटुंबासह देऊळगाव येथे हिशोब करण्यासाठी गेले.

हिशोब मागितला असता आरोपींनी शिविगाळ करीत कश्याचे पैसे असे म्हणत मारहाण केली. या दरम्यान सय्यद जफरने चाकु त्यांचा मुलगा सय्यद उसामाच्या पाठीवर व मानेवर वार करीत जिवे मारण्याचा प्रयत्न केला. यात उसामा गंभीर जखमी झाला. तसेच सय्यद अजबुरने लोखंडी गजाने मारहाण केली, तर सय्यद अजीजने तोंडावर काठी मारल्याने त्यांच्या तोंडातील ५ दाते पडली, असे फिर्यादीने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. यातील सर्व आरोपींना अटक करण्यात आली असून पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक प्रल्हाद मुंढे करीत आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!