मुंबई : श्रीलंका दौऱ्यातील पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाने विजय मिळवला आहे. श्रीलंकेने दिलेल्या २६३ धावांचे लक्ष्य भारतीय संघाने ३ गडी गमावत सहज पार केले. वेगवान खेळीसाठी सलामीवीर पृथ्वी शॉला सामनाविराच्या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.
श्रीलंका दौऱ्यातील पहिल्या सामन्यात भारताने इशान किशन आणि सुर्यकुमार यादव या दोन खेळाडूंना आंतरराष्ट्रीय पदार्पणाची संधी दिली. यात इशान किशनचा १८ जुलै रोजी वाढदिवस होता. २३वा वाढदिवशी इशान किशनने एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण करत पहिलाच सामना गाजवला. या सामन्यात इशान किशनने ४२ चेंडुत ८ चौकार आणि २ षटकारांसह ५९ धावांची अर्धशतकी खेळी केली. किशनने पहिल्याच चेंडुवर षटकार आणि दुसऱ्या चेंडुवर चौकार मारत आपल्या वाढदिवसाचे फटाके स्वत:च फोडायला सुरुवात केली. अवघ्या ३३ धावांत इशान किशनने अर्धशतकाला गवसणी घातली.
मात्र इशान किशनपुर्वी एका भारतीय खेळाडूने वाढदिवसाच्या दिवशी एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. इशान किशनपुर्वी गुरुशरण सिंग यांनी वाढदिवसाच्या दिवशी भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. १९९० साली हॅमिल्टन येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्यांनी पदार्पण केले होते. या सामन्यात त्यांनी ४ धावा केल्या होत्या. दुर्दैवाने हाच सामना त्यांचा पहिला आणि अखेरचा एकदिवसीय सामना ठरला.
महत्त्वाच्या बातम्या
- कुणीतरी येणारं येणारं गं! नेहा धुपिया दुसऱ्यांदा होणार आई
- ‘मुंबईवरील भविष्यातील संकटाचे हे संकेत तर नाही ना?’; भाजप नेत्याने व्यक्त केली भीती
- ‘जसा बेस्ट शी.एम तशी बेस्ट महापालिका; सर्वे नंतर सामना म्हणेल आमचीच लाल,’ मनसेचा खोचक टोला
- ‘मोदी सरकार कोसळण्यासाठी २०२४ पर्यंत थांबावं लागणार नाही’; बड्या नेत्याचे भाकीत
- प्रशिक्षक म्हणून द्रविडच्या विजयी सलामीनंतर शास्त्रींना हटवण्याच्या मागणीला जोर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
