मुंबई : बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले आहेत आणि एनडीए 125 जागांवर विजय मिळवण्यात यशस्वी झाली आहे. तर महाआघाडी 110 जागाच जिंकू शकली.’मोदी मॅजिक’ने तेजस्वी यादव यांचे मुख्यमंत्री बनण्याचे स्वप्न भंग केले. निवडणुकीत भाजपाने 74 जागांवर विजय नोंदवला, तर जेडीयूला 43 जागा मिळाल्याने आणि राजदने 75 जगांवर विजय संपादन केला, परंतु त्यांचा मित्रपक्ष काँग्रेसला अवघ्या 19 जागा मिळाल्या.
दरम्यान, सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या RJDला विरोधी बाकांवरच बसावं लागणार आहे. कारण भाजप, JDU आणि मित्रपक्षांच्या NDAला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. दुसरीकडे 70 जागा लढलेल्या काँग्रेसला अवघ्या १९ जागांवर विजय मिळाला आहे. त्यामुळे सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या RJDला काँग्रेसच्या सुमार कामगिरीमुळे सत्तेपासून दूर राहावं लागत आहे.
दरम्यान,बिहारच्या विधानसभा निवडणुकीत सर्व उमेदवारांचे डिपॉझिट जप्त होण्याची वेळ ओढवलेल्या शिवसेनेला भाजप नेते किरीट सोमय्या यांनी चिमटा काढला आहे. आपापल्या मतदारसंघात त्यांना एक टक्काही मते पडली नाहीत. मग आता उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांचा चमत्कार कुठे गेला, असा सवाल विचारत सोमय्या यांनी शिवसेनेला डिवचले आहे.
Bihar me Chamatkar ki bat karnewali Shivsena ki Deposit gayab. 1% Votes bhi Nahi Mile. Where is Chamatkar Mr Uddhav Thackeray???
बिहार मधे शिवसेनेची डीपोझिट गुल. १% व्हॉट्स पण नाही. श्री उध्दव ठाकरे आणि श्री संजय राऊत कुठे आहे आपला चमत्कार? @BJP4Maharashtra @Dev_Fadnavis— Kirit Somaiya (@KiritSomaiya) November 10, 2020
दरम्यान, बिहार विधानसभा निवडणुकीत असदुद्दीन ओवेसी यांच्या MIMने जोरदार प्रदर्शन करत 5 जागांवर विजय मिळवला आहे. सीमांचलमधील कोचाधामन, किशनगंज, अमोर, बहादुरजंग, बैसी, ठाकुरगंज आणि जोकीहाट या विधानसभा मतदारसंघात MIMचे उमेदवार विजयी झाले आहेत. दरम्यान ओवीसींचा MIM हा भाजपची बी टीम असल्याचा आरोप RJD आणि काँग्रेस करत राहिली आहे.
महत्वाच्या बातम्या
- सोशल मिडियाचे अभिव्यक्ति स्वातंत्र्य अबाधित राहिले पाहिजे -प्रविण दरेकर
- ‘मराठा आरक्षणासह विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी विधीमंडळाचे १५ दिवसांचे अधिवेशन घ्या’
- भाजपची ‘बी टीम’ असल्याचा आरोप होणाऱ्या MIMची बिहारमध्ये जोरदार मुसंडी
- ‘नाईक कुटुंबियांबद्दल राज्यपालांनी चिंता व्यक्त केली असती तर चांगलं वाटलं असतं’
- ‘औरंगाबादचं नाव बदलण्याने काय साध्य होणार, अस्मिता आणि प्रतिकेच्या मागे किती धावायचं’ – कोल्हे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

