मुंबई : नेते किरीट सोमय्या यांनी अनंत करमुसे यांची भेट घेतली. अनंत करमुसे यांना एका ट्वीट वरून, राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या समक्ष त्यांच्याच सुरक्षारक्षकांनी बेदम मारहाण केल्यामुळे आव्हाड यांना अटक होऊन त्वरीत जामीन झाला होता, याची किरीट सोमय्या यांनी कडक शब्दात निंदा केली. नेते किरीट सोमय्या यांनी अनंत करमुसे यांची भेट घेतली. अनंत करमुसे यांना एका ट्वीट वरून, राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या समक्ष त्यांच्याच सुरक्षारक्षकांनी बेदम मारहाण केल्यामुळे आव्हाड यांना अटक होऊन त्वरीत जामीन झाला होता, यावर किरीट सोमय्या यांनी आव्हाडांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
अनंत करमुसे प्रकरणात तीन पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. मात्र आव्हाडांवर अद्यापही कोणत्याही प्रकारची कारवाई झालेली नाही. त्यामुळे राज्यपालांकडे आव्हाड यांच्यावर देखील निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी करणार आहे, अशी माहिती भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी दिली आहे.
गुरुवारी घडलेल्या जितेंद्र आव्हाड यांच्या अटक आणि जामीन प्रकारणानंतर शुक्रवार सचिन वाजे, मनसूख हिरेन अपहरण आणि हत्या, १०० कोटी वसुली प्रकरण अशी एकापाठोपाठ एक प्रकरणे ठाकरे सरकारच्या काळात उघड झाली. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनीच आपल्या विरोधात कोणी बोलू नये यासाठी आव्हाड यांना नेमले होते. त्यातूनच अशी दहशत माजवली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.
ठाकरे सरकार हे माफीयांचे सरकार आहे. करमुसे यांच्या या प्रकरणात तीन कॉन्स्टेबल निलंबित झाले परंतु जितेंद्र आव्हाड हे मंत्री असल्यानेच त्यांना पाठीशी घालण्यात येत असल्याचा थेट आरोप त्यांनी केला. या संदर्भात आव्हाड यांच्यावर कारवाई व्हावी यासाठी आपण राज्यपालांची भेट घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- जे स्वतः स्टेबल नाहीत, त्यांनी गर्वसे कहो हम हिंदू है म्हणू नये; गुलाबरावांचा मनसेला टोला
- आव्हाडांऐवजी दुसऱ्या कुणाला त्वरित जामीन मिळाला असता का?; राम कदमांचा सवाल
- ‘महाविकास आघाडीत शिवसेनेसारखा हिंदुत्वाचा पाठीराखा पक्ष सामील झाल्याने भाजपचा बुरखाच फाटला’
- खरकटं उष्ट खाणाऱ्या, निर्लज्ज लोकांचा देश म्हणजे हिंदुस्थान; संभाजी भिडेंचं पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य
- मुख्यमंत्री पातळीवर रात्रीतून मोठ्या हालचाली, शिवसेनेच्या दसरा मेळाव्यातील अडथळे केले दूर
- तर ५६ शिवसेनेचे आमदार आता भाजपसोबत असते – गुलाबराव पाटील


