औरंगाबाद : खुलताबाद नगर परिषद कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी ३० जूनपासून ३ जुलैपर्यंत काळ्या फिती लावून लेखणी बंद आंदोलन करण्याचा निर्धार कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला आहे. या उप्परही शासनाने मागण्या मान्य न केल्यास ५ जुलैपासून कामबंद आंदोलन पुकारण्यात येईल, असा इशारा न.प. कर्मचाऱ्यांनी दिला आहे.
खुलताबाद न.प. कर्मचाऱ्यांनी संघटनेचे राज्य अध्यक्ष डी.पी.शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली न.प.प्रभारी मुख्याधिकारी तथा नायब तहसीलदार सतीश देशमुख, तहसीलदार सुरेंद्र देशमुख, पोलिस निरीक्षक सीताराम मेहेत्रे, नगराध्यक्ष अ;ॅड.एस.एम.कमर उपनगराध्यक्ष सुरेश मरकड, सर्व नगरसेवक व नगरसेविका यांना मंगळवारी विविध मागण्यांचे निवेदन सादर केले.
यावेळी नगर परिषद कर्मचारी संघटनेचे खुलताबादचे स्थानिक अध्यक्ष शहजाद बेग मुमताज बेग, उपाध्यक्ष अंकुश भराड पाटील, सचिव जितेंद्र बोचरे, सहसचिव कासीम बेग, कोषाध्यक्ष जे.के.चौधरी आदी कर्मचारी उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या
- ‘ओबीसींचे राजकीय आरक्षण कायम केल्याशिवाय निवडणुका होऊ देणार नाही’, आ.अतुल सावेंचा इशारा
- जिल्हा परिषदेच्या सव्वा कोटी निधीतून साकारणार ‘बाजार सावंगी’
- नवी मुंबई विमानतळाच्या नामांतराचा वाद चिघळला, आज सिडकोला 1 लाख लोकांचं घेराव आंदोलन
- टाकळी अंतर्गत रस्त्याच्या निकृष्ट कामाची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार
- पराभवामुळे दु:खी झालेल्या कोहलीने दिला इशारा ; कसोटी संघात करणार बदल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

