Share

‘महिलांचा सन्मान करणारी बाळासाहेबांची शिवसेना कुठे आणि आजची शिवसेना कुठे ?’

Published On: 

मुंबई : आम आदमीच्या नेत्याने अयोध्येतील राम मंदिराच्या भूखंड खरेदी प्रकरणात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला होता. यानंतर काँग्रेससह शिवसेनेनं या प्रकरणी टीकास्त्र सोडलं होतं. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनामधून देखील टीका करण्यात आल्यांनतर भाजप आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. शिवसेनेच्या टीकेनंतर भाजप युवा मोर्चाने थेट शिवसेना भवनावर ‘फटकार’ मोर्चा काढला.

भाजप युवा मोर्चाने सेना भवनावर कूच करताच, शिवसैनिकांनी आक्रमक पवित्रा घेतला असल्याचे आपल्याला पाहायला मिळाले. सेना आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये मोठी धुमश्चक्री झाली. एकमेकांना मोठ्या प्रमाणात मारहाण करण्यात आली. पोलिसांनी भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांना रोखल्यानंतर शिवसैनिकांनी त्यांच्याकडे धाव घेतली आणि दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड धुमश्चक्री उडाल्याचं पाहायला मिळालं.

दरम्यान, भाजप कार्यकर्त्यांसोबतच शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी महिलेवर देखील हात उचलल्याचा आरोप भाजपने केला आहे. हे प्रकरण चांगलंच तापलं असून आता भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी शिवसेनेवर टीका केली आहे. सत्तेपाई सत्व गमावले, असं म्हणतानाच उपाध्ये यांनी बाळासाहेबांची शिवसेना महिलांचा सन्मान करणारी होती पण आताची शिवसेना महिलांवर हात उचलत आहे असा आरोप देखील केला आहे.

‘महिलांचा सन्मान करणारी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना कुठे आणि आज महिलांवर हात उगारणारी शिवसेना कुठे? काँग्रेस-राष्ट्रवादीवर टीका करणारी बाळासाहेबांची शिवसेना कुठे ? आता त्यांच्या वळचणीला बसत राम मंदीराचा त्रास होणारी आजची शिवसेना कुठे? सत्तेपाई सत्व गमावले,’ असा प्रहार केशव उपाध्ये यांनी केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!