🕒 1 min read
मुंबई : ओबीसी समाजाचे आरक्षण रद्द झाल्यानंतर ५ जिल्हा परिषद आणि ३३ पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकीच्या घोषणा करण्यात आली आहे. यामुळे ओबीसी समाजासह भाजप आक्रमक झाला असून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
तर, ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण सुप्रीम कोर्टात रद्द होण्यास राज्यातील तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकार आणि केंद्रातील मोदी सरकारच जबाबदार आहे. या आरक्षणासाठी आवश्यक असलेली आकडेवारी सुप्रीम कोर्टाने मागितली असता केंद्र सरकारने ती दिली नाही. राज्यात व केंद्रातही भाजपाचे सरकार असताना जाणीवपूर्वक कोर्टाला आकडेवारी दिली नाही म्हणूनच ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द झाले, असा आरोप काँग्रेसकडून केला जात आहे.
दरम्यान, भाजपने आता काँग्रेसला सडेतोड उत्तर दिलं आहे. भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ‘इम्पेरिकल डाटा’बाबत ट्विट करून काँग्रेसला लक्ष्य केलं आहे. तसेच ‘काँग्रेसचे नेते म्हणजे अज्ञानाचा महामेरू’ असा टोला देखील उपाध्येंनी लगावला आहे.
पण, 2013 रोजी त्यावेळच्या डॉ. मनमोहनसिंग सरकारने एक आदेश काढला होता की, ही माहिती राज्यांना देऊ नका. कारण, हा संपूर्ण डेटा चुकीचा आहे. तो राज्यांना दिला तर अनेक गंभीर आणि नवीन प्रश्न निर्माण होतील. 2/3
— Keshav Upadhye (@keshavupadhye) June 27, 2021
‘काँग्रेसचे नेते म्हणजे अज्ञानाचा महामेरू आहेत. विजय वडेट्टीवार केंद्राकडे बोट दाखवतात तर सचिन सावंत काही पत्राकडे बोट दाखवतात अहो पण एसईसीसीचा डेटा हा 50 टक्क्यांच्या आतल्या आरक्षणासाठी नाही, तर वरचे आरक्षण टिकले पाहिजे, यासाठी ती माहिती मागण्यात आली. पण, 2013 रोजी त्यावेळच्या डॉ. मनमोहनसिंग सरकारने एक आदेश काढला होता की, ही माहिती राज्यांना देऊ नका. कारण, हा संपूर्ण डेटा चुकीचा आहे. तो राज्यांना दिला तर अनेक गंभीर आणि नवीन प्रश्न निर्माण होतील,’ असा मुद्दा केशव उपाध्ये यांनी समोर मांडला असून यासोबत देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणाच्या लिंक देखील दिल्या आहेत.
आणि अजूनही विषय समजला नसेल तर या दोन लिंक ऐका. त्याने २ फायदे होतील.
१. डोक्यात प्रकाश पडेल
२. आरक्षणाचा प्रश्न सोडविणे सोपे होईल. https://t.co/iWEZ9U6jCjhttps://t.co/wVD5nQSeit३/३
— Keshav Upadhye (@keshavupadhye) June 27, 2021
महत्वाच्या बातम्या
- ‘अयोध्येतून समृद्ध परंपरा जगभरात पोहोचावी’, पंतप्रधान मोदींची अपेक्षा
- ‘अयोध्येतून समृद्ध परंपरा जगभरात पोहोचावी’, पंतप्रधान मोदींची अपेक्षा
- ‘काकांच्या सांगण्यावरून हा हुजऱ्या अजित पवारांच्या बुडाखाली फटाके वाजवण्याचं काम करतोय’
- ‘आठवणीतले दिवस’, फलंदाजीचा सराव करत असताना चाहरला आठवले शाळेतले दिवस!
- ‘ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसींचे आरक्षण गेले पण मी केंद्रात प्रयत्न करणार’- आठवले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
