Share

परदेशी कलाकाराकडून पेश झालेल्या भारतीय शास्त्रीय संगीताला पुणेकरांची दाद

Published On: 

🕒 1 min read

पुणे  : मुळचे स्वित्झर्लंडचे असलेले केन झुकरमन यांच्या हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतातील सरोद वादनाला रसिकांनी भरभरून दाद दिली. संगीतमार्तंड पं. जसराज यांच्या गायनाने तिसर्‍या दिवसाची सांगता झाली.

केन झुकरमन हे ज्येष्ठ सरोदवादक उस्ताद अली अकबर खान यांचे शिष्य असून त्यांनी राग चंद्रनंदनने वादनाची सुरुवात करत तीनतालातील दोन रचना सादर केल्या. त्यानंतर राग गोरख कल्याण मधील रचना सादर करून आपल्या मैफलीचा समारोप केला. त्यांना रामदास पळसुले (तबला), अनुप जोशी (तानपुरा) यांनी संगत केली.

त्यानंतर संगीतमार्तंड पं. जसराज यांनी राग जयजयवंतीमध्ये ‘जय जय सिद्धी..’ या रचनेने आपल्या गायनाची सुरुवात केली. “आपण रसिकांच्याच आशीर्वादामुळेच मी गाऊ शकत आहे.” अशा भावनाही त्यांनी यावेळी व्यक्त केल्या. त्यांना मुकुंद पेटकर (हार्मोनियम), रामकुमार मिश्रा (तबला), अंकिता जोशी (तानपुरा), रतन मोहन शर्मा, तृप्ति मुखर्जी, सुरेश पत्की, दुर्गा जसराज यांनी साथसंगत केली.

महत्वाच्या बातम्या 

https://twitter.com/Maha_Desha/status/1205777013228728321?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1205776611645087745?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!